फोटो सौजन्य- pinterest
शारदीय नवरात्रीत नऊ दिवसांच्या भक्ती आणि उपासनेनंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. यालाच विजयादशमी किंवा दसरा म्हणूनही ओळखले जाणारा हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी भाविक दुर्गा देवीला अश्रूंनी निरोप देतात आणि मूर्ती विसर्जनाबरोबरच कलश विसर्जनाचेही विशेष महत्त्व आहे. कलश विसर्जन करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे, विसर्जनाची काय आहे पद्धत जाणून घ्या
नवरात्रीच्या काळात भक्त त्यांच्या मंडपामध्ये नऊ दिवस देवीची स्थापना करतात त्यानंतर नऊ दिवस पूजा आणि उपवास केला जातो. दशमीला देवी दुर्गा कैलास पर्वताकडे प्रस्थान करते आणि भक्तांना त्यांच्या कल्याणासाठी आशीर्वाद देऊन निरोप देते असे मानले जाते. मूर्तीचे विसर्जन हे देवी आता तिच्या निवासस्थानी परतत आहे आणि भक्त पुढच्या वर्षी तिची पुनर्स्थापना करतील याचे प्रतीक आहे.
जर विसर्जनापूर्वी मूर्ती तुटली असल्यास किंवा तिचे काही नुकसान झाले असल्यास तिचे पूर्ण विधिपूर्वक आणि आदराने विसर्जन करावे.
नवरात्रीत प्रज्वलित होणारी शाश्वत ज्योत विसर्जनापूर्वी विझवू नये. पूजा झाल्यानंतर वात काढून व्यवस्थितरित्या ठेवावे. त्यानंतर उरलेले तेल किंवा तूप पुढील पूजा किंवा हवनात त्याचा वापर करता येऊ शकतो.
विसर्जनापूर्वी, देवीची षोडशोपचार पूजा करावी आणि पूजेदरम्यान झालेल्या चुकांची क्षमा मागावी. हे अनिवार्य आहे. विसर्जनादरम्यान मंत्रांचा जप करावा.
मूर्तीच्या स्थापनेसोबतच कलशाची देखील स्थापना केली जाते. ज्याला देवीचे प्रतीक मानले जाते. तो नारळ, आंबा किंवा अशोकाची पाने आणि पाण्याने भरलेला असतो. याला देवीच्या उर्जेचे आणि शक्तीचे केंद्र मानले जाते.
मूर्ती विसर्जित करण्यापूर्वी कलशाची पूजा करावी. कलशात साठवलेले पाणी तुळशीच्या झाडावर किंवा तुमच्या घरातील कोणत्याही पवित्र ठिकाणी शिंपडा. विसर्जनाच्या ठिकाणी नारळ आणि पाने वाहा. कलश गंगाजलाने शुद्ध करून घरात ठेवता येतो, हे शुभ मानले जाते.
असे मानले जाते की, मूर्ती आणि कलश याचे नियम योग्यरित्या पाळले गेल्यास घरामध्ये सुख, समृद्धी, शांती आणि शक्ती कायम राहते. त्यासोबतच देवी भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करते आणि कुटुंबाला वाईट नकारात्मक उर्जेपासून सुरक्षित ठेवते अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)