फोटो सौजन्य- pinterest
शक्ती आणि भक्तीचा नऊ दिवसांचा दिव्य प्रवास पूर्ण केल्यानंतर, आता देवी दुर्गेला निरोप देण्याची वेळ आली आहे. यंदा दसऱ्याचा सण 2 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येईल. ज्याप्रमाणे देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यासाठी विशेष विधी आहेत त्याचप्रमाणे निरोप देण्यासाठी देखील काही विशेष नियमांना देखील महत्त्व आहे. यंदा विसर्जनाच्या वेळी देवी पालखी किंवा डोलीवर बसून निघणार आहे. देवीचे पालखीवरुन प्रस्थान हे आनंद आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. जाणून घ्या विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे काय आहे महत्त्व ते जाणून घेऊया
पंचांगानुसार, दसऱ्याला देवीचे विसर्जन करण्यासाठी गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.32 ते 8.54 हा सर्वोत्तम वेळ मानला जातो. तर दुपारी पूजेची वेळ 1.21 ते 3.44 पर्यंत असेल.
विजयादशमीच्या दिवसानुसार देवीच्या आगमन आणि प्रस्थानाचे वाहन निश्चित केले जाते. यावर्षी विजयादशमी गुरुवारी आहे, म्हणून देवी दुर्गा डोली (मानवी वाहन) वर निघेल.
प्रत्येक वाहनाचे स्वतःचे एक खास महत्त्व असते. यावेळी देवी पालखीवर बसून प्रस्थान करणार आहे. यालाच आनंद, शांती आणि सौहार्दाचे प्रतीक मानले जाते. हा निरोप देणे म्हणजे देवी तिच्या भक्तांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देते आणि पुढच्या वर्षी परत येण्याचे वचन देते.
देवीचे विसर्जन करण्यापूर्वी शेवटची पूजा आणि षोडशोपचार पूजा करुन घ्यावी. त्यानंतर देवीला सिंदूर, तांदूळ, फुले, मिठाई, कपडे इत्यादी अर्पण करावे आणि भक्तीने आरती करा. नमस्तेऽस्तु महादेवि महा मायि सुरेश्वरि. पूजाराधनकाले च पुनरागमनाय च. अर्थात: हे महादेवी, हे महामाया, हे सुरेश्वरी! आपको नमस्कार है. या मंत्रांचा जप करावा.
ढोल-ताशांच्या तालावर आणि देवीच्या स्तुतीच्या गजरात मूर्ती उचला. मूर्ती आदराने पवित्र नदी, तलाव किंवा कृत्रिम विसर्जन तलावात घेऊन जा. त्यानंतर हळूहळू मूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन करा. त्यानंतर पूजेदरम्यान देवीला अर्पण केलेले साहित्य मूर्तीसह विसर्जित करा. नंतर कलशातील नारळ काढून ते कुटुंबातील महिलेला द्या किंवा त्याचा प्रसाद म्हणून वाटा. त्यानंतर आंब्याच्या पानांचा वापर करून कलशातील पाणी घरभर शिंपडा.
हे पाणी घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. उरलेले पाणी पिंपळाच्या झाडाच्या किंवा कोणत्याही पवित्र वनस्पतीच्या मुळाशी ओता. भांड्यामधून नाणे काढून घ्या नंतर ते लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. जर तुमच्या घराजवळ नदी किंवा तलाव नसल्यास मूर्ती घरीच एका मोठ्या भांड्यात विसर्जित करावी आणि ती माती आणि पाणी नंतर पिंपळाच्या किंवा कोणत्याही पवित्र झाडाच्या मुळाशी ओतावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)