नव्या वर्षात कोणत्या राशींची होणार भरभराट
ज्योतिष शास्त्रानुसार येणारे नवीन वर्ष म्हणजे 2025 हे ग्रह राशीच्या दृष्टीकोनातून खूप खास असणार आहे. अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत, त्यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होणार आहेत, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. तो सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असा सर्व राशींवर पडलेला दिसून येणार आहे.
01 जानेवारी रोजी चंद्र आपली राशी बदलेल. हे एक अतिशय शुभ संयोजन तयार करत असून 3 राशींना याचे सकारात्मक फळ मिळणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ, नोकरीत बढती आणि समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येत आहे. कोणत्या आहेत या राशी आणि काय असणार आहे प्रभाव याची अधिक माहिती आपण ज्योतिषाचार्यांकडून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतात ज्योतिषी
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुदगल यांनी एका हिंदी संकेतस्थळाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, 1 जानेवारी रोजी चंद्र आपले राशी बदलणार आहे. चंद्र मकर राशीत प्रवेश करेल. तेथे मंगळ सातव्या भावात स्थित आहे. या दोघांच्या संयोगाने धनयोग नावाचा राजयोग तयार होणार आहे, ज्याचा तीन राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्या तीन राशी म्हणजे वृषभ, कर्क आणि वृश्चिक. या राशींवर नक्की काय परिणाम होणार आहे हेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
Garud Puran: मेल्यानंतर ‘या’ 9 अवयवातून बाहेर येते आत्मा, पापी व्यक्तीच्या शरीराचा त्याग कसा होतो
वृषभ राशीच्या लोकांना काय होणार फायदा
चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे धनयोग तयार होत आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय शुभ असणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. अनेक दिवसांपासून सुरू असलेली समस्या संपुष्टात येईल. कामामुळे समाजात मान-प्रतिष्ठा वाढणार आहे. या राशीच्या व्यक्तींचा वाईट काळ लवकरच संपणार आहे
कर्क राशीचे उत्पन्न वाढणार
कर्क राशीच्या व्यक्तीवर याचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रत्येक नियोजित काम पूर्ण होणार आहे. शत्रू तुमच्याकडून पराभूत होताना दिसतील. नोकरीत प्रगतीसोबतच पगार वाढण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात पैसे गुंतवल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
2024 ची शेवटची अमावस्या, तुळशीवर 5 पदार्थ करा अर्पण, देवी लक्ष्मी पाडेल पैशांचा पाऊस
वृश्चिक राशीवर सकारात्मक परिणाम
वृश्चिक राशीवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला भरपूर यश मिळू शकते. शेअर बाजारात पैसे गुंतवले तर यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला येणारे वर्ष अत्यंत चांगले आणि लाभदायक जाणार आहे. लवकरच संकटं संपून राजयोग निर्माण होणार आहे
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.