सोमवती अमावस्येला करा तुळशीला हे अर्पण
या वर्षातील शेवटची अमावस्या 30 डिसेंबरला आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष अमावस्या मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तारखेला साजरी केली जाते. 2024 सालातील शेवटच्या अमावस्येला सोमवारचा योगायोग आहे. त्यामुळे ती सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. या अमावस्येचे अनन्यसाधारण महत्त्व मानले जाते.
ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे खूप शुभ आहे. अशा परिस्थितीत सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात हे ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी सांगितले आहे, जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
लाल रंगाचा धागा
सोमवती अमावस्येच्या दिवशी अर्थात सोमवारी 30 डिसेंबर, 2024 रोजी लाल रंगाचा धागा तुळशीला बांधावा. असे मानले जाते की या दिवशी लाल रंगाचा धागा तुळशीच्या रोपट्याला बांधल्याने देवी लक्ष्मी तसेच भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. याशिवाय मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
सोमवती अमावस्येला करा या स्तोत्राचा पाठ, सर्व इच्छा होतील पूर्ण
लाल रंगाची ओढणी
सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीमातेला लाल रंगाची ओढणी अर्पण करणे शुभ ठरते. असे मानले जाते की या दिवशी मातेला तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण केल्याने जीवनात संपत्तीची कमतरता येत नाही. लक्ष्मी मातेचा लाल रंग हा आवडता मानला जातो आणि ओढणी है सौभाग्याचे लक्षण मानले जात असून यामुळे लक्ष्मी अधिक प्रसन्न होते असेही ज्योतिषशास्त्रानुसार मानले जाते
तुपाचा दिवा
सोमवती अमावस्येला तुळशीला कच्चे दूध अर्पण करा. यासोबत तुळशीखाली तुपाचा दिवा लावावा. हे दोन्ही केल्यानंतर तुम्ही तुळशीसमोर प्रार्थना करा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते. तुळशीची पूजा ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि अमावस्येला याचे विशेष फळ मिळते असंही म्हटलं जातं. असं तर तुपाचा दिवा रोज तुळशीजवळ लावणे हेदेखील अत्यंत चांगले मानले जाते. यामुळे घरात शांतता आणि सुखसमाधान राहते असे मानण्यात येते
पिवळा धागा
सोमवती अमावस्येच्या दिवशी पिवळ्या धाग्यात 108 गाठी बांधून तुळशीला बांधा. हे करण्यासोबतच आपल्या किंवा आपल्या कुटुंबासाठी सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची प्रार्थना करा. ज्यामुळे लक्ष्मीचा आशिर्वाद मिळून तुम्हाला भरभरून पैसा आणि सुखसमृद्धी प्राप्त होईल असं सांगण्यात येते
शनिची चाल करेल हाल! 4 राशींवर होणार साडेसातीचा त्रास, काहींना मुक्ती तर काहींंची हिरावणार सुखसमृद्धी
श्रृंगाराचे सामान
सोमवती अमावस्येला तुळशीमातेला श्रृंगाराचे सामान अर्पण करावे. असे मानले जाते की या दिवशी मातेला तुळशीला श्रृंगाराच्या वस्तू अर्पण केल्याने जीवनातील दुःख आणि वेदना दूर होतात. तुळशीला श्रृंगाराचे सामान अर्पण केल्याने लक्ष्मीची अधिक कृपा होते आणि घरात अत्यंत सुखसमाधान राहते
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.