
फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस चढ उताराचा असू शकतो. आज अंक 5 असणाऱ्याचा स्वामी ग्रह बुध आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज शुक्रवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. आज मूलांक 5 असणाऱ्या लोकांना वादविवादापासून दूर रहायला हवे आणि मूलांक 6 असणारे लोक मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांवर कामाचा ताण येईल. तुम्ही आज व्यस्त राहाल. सहकार्याचा पाठिंबा मिळेल. कुटुंबात सामान्य वातावरण राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी काम उशिराने पूर्ण होतील. त्यामुळे तुमच्यावर ताण येऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वादविवादापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी सावध राहावे.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. वरिष्ठांचा दबाव तुमच्यावर राहू शकतो. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. मुलांच्या बाबतीत समस्या जाणवू शकतात.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. लाभ न झाल्याने तुम्ही उदास राहू शकता. वादविवाद होऊ शकतात. सकारात्मक विचाराने पुढे गेल्यास फायदा होईल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आजचा थोडा दिवस ताणाचा राहील. कामाच्या ठिकाणी अपूर्ण कामे वेळेवर पूर्ण होतील. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. भावंडांसोबत वेळ घालवाल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही बाहेर जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे काम उशिराने पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी काम वेळेवर पूर्ण होतील. महत्त्वाच्या सामानाची खरेदी करू शकता. अनावश्यक खर्च होऊ शकतो.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर ताण येऊ शकतो. शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. आर्थिक समस्येचा सामना करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कुटुंबातील वातावरण शांततेचे राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)