फोटो सौजन्य- istock
अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असणाऱ्यांचा स्वामी केतू ग्रह आहे. सोमवारच्या स्वामी ग्रहाची संख्या 2 मानली जाते. मूलांक 2 असलेले लोक व्यवसायमध्ये भागीदारीत काम करुन यश प्राप्त करु शकतात. तर मूलांक 7 असलेले लोक नवीन कामाची सुरुवात करुन त्यात यश प्राप्त करु शकतात. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेले लोक कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. व्यवसाय संबंधित घेतलेले निर्णयांचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा दिवस चांगला राहील. कोणत्याही कामात भागीदारीत काम करत असल्यास यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना भूतकाळातील अनुभवामधून नवीन काही शिकायला मिळेल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
मूलांक 3 असलेल्या लोकांना नवीन कल्पना सुचू शकतात. तुमच्या कामातही सर्जनशीलता आणि नाविन्य दिसून येईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कोणतेही जुने काम अडकले असेल ते पूर्ण होईल.
मूलांक 5 असलेल्या लोकांना विविध बदलांना सामोरे जावे लागेल. हे लोक आज कामामध्ये व्यस्त राहू शकतात. तुम्ही कामानिमित्त बाहेर प्रवास करु शकता. सामाजिक लोकांकडून फायदा होऊ शकतो.
मूलांक 6 असलेल्या लोकांना नातेसंबंधात गोडवा राहील. तुम्हाला आज मानसिक शांती मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. घरातील वातावरण चांगले राहील.
मूलांक 7 असलेले लोक एखाद्या विचारांवर सखोल विचार करतील. आज अभ्यास, संशोधन आणि नवीन माहिती मिळविण्यात तुमची आवड वाढू शकते. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
मूलांक 8 असलेल्या लोकांनी कामाच्या ठिकाणी संयम बाळगावा. आर्थिक गोष्टीत सावधगिरी बाळगावी. एखादी दीर्घकाळापासून सुरु असलेली समस्या आज संपेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. एखादे काम समजूतीने केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल.
मूलांक 9 असलेले लोक कामाच्या ठिकाणी धाडसी निर्णय घेऊ शकते. तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगली कामगिरी दाखवू शकतात. कुटुंबात आनंद राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये अनेक संधी मिळतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)