फोटो सौजन्य- pinterest
जून महिन्याचा तिसरा आठवडा म्हणजे 16 जून ते 22 जूनचा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. यावेळी मिथुन राशीमध्ये सूर्याने संक्रमण केल्यामुळे विविध राजयोग तयार होत आहे. या आठवड्यामध्ये योगिनी एकादशीचे व्रत देखील पाळले जाणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी जून महिन्याचा तिसरा आठवडा कसा असेल, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्याची सुरुवाच आत्मविश्वासाने भरलेला असेल. करिअरच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. यावेळी तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून मदत आणि पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस शुभ आहे. कामानिमित्त तुम्ही प्रवास करु शकता.
वृषभ राशीची लोक आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करतील. कामावर तुमच्या कामाची प्रशंसा मात्र तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुन्या दीर्घकालीन योजनेतून तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. नवीन योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांचा दिवस चांगला राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित स्वरुपाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या खर्च जास्त असेल मात्र अनावश्यक खर्च करणे टाळा. नात्यामध्ये असलेले मतभेद तुम्हाला समजुतीने सोडवावे लागतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे. या आठवड्यामध्ये तुमच्या नात्यामध्ये कोणतेही मतभेद असतील ते दूर होतील. नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. या लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. तुम्ही नवीन योजना आखू शकतात.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल. तुमची पदोन्नती होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करु शकतात.
कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये कठोर मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. तुम्हाला आर्थिक फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. कामानिमित्ताने प्रवास करण्याची शक्यता.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनेक आव्हाने घेऊन येणारा राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखणे आवश्यक राहील. जुन्या कामात अडथळा येत असल्यास तो सुटेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील त्याचा तुम्हाला फायदा होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नाविन्य घेऊन येणारा राहील. तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळू शकते. परिवारामध्ये आनंदी वातावरण राहील. मानसिक ताण कमी होईल. आरोग्याची काळजी घ्यावी.
धनु राशीचे लोक या आठवड्यामध्ये व्यस्त राहतील. तुम्हाला नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कठोर मेहनतीचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुमचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. खर्च करताना सावधानगिरी बाळगावी लागेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन योजनांनी भरलेला असेल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अनावश्यक खर्च करणे टाळा. मानसिक ताण कमी होईल. आरोग्य चांगले असेल.
मीन राशीचच्या लोकांचा हा आठवडा भावनिक असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल खर्चावर नियंत्रण ठेवा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)