
फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी चढ उताराचा राहील. अंक 8 असणाऱ्याचा स्वामी ग्रह शनि आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज बुधवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधाचा अंक 5 आहे. आज मूलांक 5 असणाऱ्या लोकांना नवीन योजनांमुळे फायदा होईल आणि मूलांक 8 असलेल्या लोकांना तणावापासून दूर रहायला हवे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्यावरील तणाव लवकर दूर होईल. सर्व गैरसमज दूर होतील. कामाच्या बाबतीत एखाद्या मोठ्या आणि सकारात्मक बदलांमुळे नवीन दिशा मिळू शकते. यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील आणि जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. जर तुमच्यावर तणाव असेल तर तो दूर होईल. भविष्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च करणे टाळा. एखाद्या गोष्टीबाबत जास्त चिंता करणे टाळा. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना सर्वांसमोर मांडू शकता. दीर्घकाळापासून तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांसमोर मांडा. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण शांतीचे राहील आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नवीन योजनेमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्यामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील. अशा वेळी उत्साह आणि मेहनतीने तुम्ही तुमची काम पूर्ण कराल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवाल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. जवळच्या व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवाल आणि पूर्ण दिवस उत्साहाचा राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चढ उताराचा राहील. नवीन आणि जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अनुभव मिळू शकतात. सामाजिक संबंध सुधारतील. वैवाहिक जीवन चांगले राहील.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जास्त विचार करणे टाळावे अन्यथा मानसिक तणाव वाढू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळू शकतो. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील आणि आर्थिक समस्या दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)