मेष
या आठवड्यात तयार होणारा लक्ष्मीयोग मेष राशीच्या व्यक्तींना मेहनतीचं फळ देणारं आहे. व्यवसाय आणि नोकरदार वर्गासाठी हा आठवडा शुभदायी असणार आहे.वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. करियर नोकरीबाबत कोणताही निर्णय घेताना काळजीपुर्वक घ्या. आता घेतलेला निर्णय तुमच्या येणाऱ्या काही दिवसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वागण्यात संयम ठेवणं गरजेचं आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
स्थावर किंवा जंगम मालमत्तासंबंधित वृषभेच्या मंडळींसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. जमिनीसंबंधित एखादा करार तुम्हाला आर्थिक फायदा देऊ शकतो. विद्यार्थ्याना करिअरबाबत हा आठवडा शुभ आहे. तुमच्या करियरला नवं वळण मिळणार असून गोंधळलेल मन निर्णय घेण्यास सक्षम होईल. नोकरदार वर्गाा देखील हा आठवडा प्रगतीशील आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधआरण्यास मदत होईल.
मिथुन (Gemini Zodiac)
मिथुन राशीसाठी हा आठवडा काहीसा संमिश्र असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही किरकोळ अडथळ निर्माण होऊ शकतात. मात्र संयम आणि संतुलित वागणुकीमुळे ताण हलका होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सावधगिरीने वागावं. आठवड्याच्या मध्यामपर्यंत परिस्थितीत सुधारणा होईल.
कर्क (Cancer Zodiac)
लक्ष्मीयोगामुळे कर्क राशीच्या मंडळीना कौटुंबिक शांतता लाभणार आहे. कौटुंबिक नातेसंबंधात सकारात्मक बदल घडून येतील. कामाच्या ठिकाणी मात्र सहकाऱ्यांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. कामाच तणाव निर्माण होत असला तरी तुमच्या शांत राहण्याने वाद मिटतील.
सिंह (Leo Zodiac)
कामाचं कौतुक होईल. गुप्त शत्रू तुमच्या कामात अडथळे आणतील मात्र तुमच्या वागणूकीने तुम्ही वरिष्ठांचं मन वळवण्यात यशस्वी व्हाल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत विचार करुन केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रपरिवाराशी गाठीभेटी होतील.
कन्या (Virgo Zodiac)
हा आठवडा यश प्राप्तीचा आहे. कामाच्या ठिकाणी नव्या प्रकल्पातून तुम्हाला चांगले अनुभव मिळतील. सहकऱ्यांचा पाठींबा मिळेल. आर्थिक बाबातीला हा काळ अनुकूल असणार आहे. कौैटुंबिक स्थिती साकारात्मक राहणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
आयुष्यात साकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्य़ा संधीचं सोनं कराल.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
हा आठवडा तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. मानसिक ताण वाढल्याने शारीरिक थकवा जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधात कट रचले जाणार आहेत. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराबरोबरचे मतभेद टाळा. हा आठवडा करिअर आणि नातेसंबंधाबाबत सामान्य राहणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
कोर्ट कचेरीत निकाल तुमच्या बाजूने लागतील. विरोधकांना प्रभाव कमी होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार असून कर्जाचा ताण हलका होणार आहे. पैशांची आधी केलेली गुंतवणूक आता फायदेशीर ठरेल.
मकर (Capricorn Zodiac)
धावपळ दगदग वाढणार आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी. कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे मन आणि मेंदू शांत ठेवा. करिअरसंबंधित चांगली बातमी मिळू शकते. सकारात्मक दृष्टीकोन मानसिक संतुलन राखण्यास मदत करेल.
कुंभ (Aquarius Zodiac)
सामाजिक मान प्रतिष्ठा वाढणार आहे. आत्मविश्वासाने विरोधकांना तोंड द्याल. कुंभ राशीच्य़ा व्यक्तींना हा काळ संंमिश्र असणार आहे. वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होईल.
मीन (Pisces Zodiac)
मित्र वर्गाकडून सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीचं सुधारणा दिसेल. विरोधकांच्या अडचणींमुळे ताण जाणवले म्हणूनच मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या.
( येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोककथांवर आधारित आहे. यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. नवराष्ट्र डिजीटल यापैकी कोणत्याही विधानाची सत्यता प्रमाणित करत नाही.)






