फोटो सौजन्य- istock
आज गुरुवार असल्याने आजचा अधिपती ग्रह गुरु आहे. अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 असलेले लोक कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची भूमिका बजावून आपला आत्मविश्वास वाढवतील. मूलांक 3 असलेले लोक नवीन कामाची सुरुवात करु शकता. कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखणे फायदेशीर ठरु शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या.
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची भूमिका बजावू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. कोणत्याही स्पर्धेत तुम्ही सहभागी झाला असाल तर तुम्हाला यश मिळेल.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांना आजचा दिवस सामान्य राहील. परिवारामध्ये शांतीचे वातावरण राहील. तुमच्या मनात सहकार्याची
भावना असेल. तुम्हाला कामामध्ये यश मिळेल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांची सुरुवात चांगली होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नातेसंबंधात तुमचा गोडवा कायम राहील.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचे दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेले काम आज पूर्ण होईल. तुम्हाला कोणतेही काम करताना हुशारीने करावे लागेल. त्याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. एखाद्या विषयावर परिवारातील सदस्यांसोबत तुम्ही चर्चा करु शकता.
मूलांक 5 असलेले लोक आज कामात व्यस्त राहू शकतात. सहकाऱ्यांशी चर्चा तुम्हाला एक नवीन दिशा देऊ शकते. तसेच कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस चांगला राहील. कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावे लागू शकते.
मूलांक 6 असलेले लोक जोडीदारासोबत आपला वेळ घालवतील. कोणतेही आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. मानसिक ताण कमी होईल. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या घटनेमुळे तुमचे मन अस्वस्थ राहू शकते. अभ्यास, संशोधन किंवा एकांतवासाशी संबंधित कामे आणि क्रियाकलापांमध्ये तुमची आवड वाढू शकते.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना कामाच्या ठिकाणी फायदा होईल. आर्थिक गोष्टीत स्थिरता राहील. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही कठीण परिस्थितीवर मात करु शकता.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. कोणतेही निर्णय घेताना घाई करु नका. मानसिक शांती मिळेल. नातेसंबंधामध्ये कायम गोडवा राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)