
फोटो सौजन्य- pinterest
आजचा बुधवारचा दिवस चढ उताराचा राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुधवार आहे. आजच्या बुधवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे. बुधाचा अंक 5 आहे. आज मूलांक 3 असलेल्या लोकांच्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतील. मूलांक 5 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात नवीन संपर्क साधू शकता. समाजामध्ये मान प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमच्यावरील तणाव दूर होईल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळेल. व्यवसायात घेतलेल्या निर्णयाने तुम्हाला फायदा होईल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये येणाऱ्या लोकांचा समस्या दूर होतील. तुम्ही कामामध्ये जास्त व्यस्त राहाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमच्यावरील तणाव कमी होईल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील. तुमच्यावरील तणाव दूर होतील. सामाजिक क्षेत्रात तुमची मान प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्ही सामाजिक कामामध्ये व्यस्त राहू शकता. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्हाला काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात, ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. उच्च शिक्षणात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र राहील. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमची एखाद्या खास व्यक्तीसोबत तुमची ओळख होऊ शकते त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये वातावरण शांतीचे राहील.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकते. तुम्हाला अपेक्षित फायदा होते. तुम्हाला काहीतरी खास मिळू शकते, जे तुम्हाला आनंदी करेल. कुटुंबामध्ये तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)