फोटो सौजन्य- pinterest
आपल्या शरीराचा प्रत्येक भाग आपल्याला काहीना काही संकेत देत असतो. तुमच्या देखील नखांवर पांढरे डाग आहेत का? हे डाग असल्यास बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हस्तरेषाशास्त्र आणि आयुर्वेदानुसार हे छोटे चिन्ह बहुतेकदा जीवनात येणाऱ्या बदलांबद्दल, आरोग्य स्थितीबद्दल आणि आर्थिक परिस्थितीबद्दल महत्त्वाची माहिती देतात. नखांवरील पांढऱ्या डागांचा जीवनाशी काय असतो संबंध, जाणून घ्या
वैद्यकीय शास्त्रानुसार, नखांवर पांढरे डाग बहुतेकदा झिंक, कॅल्शियम किंवा व्हिटॅमिनची कमतरता, दुखापत किंवा अॅलर्जीमुळे होतात. मात्र हस्तरेषाशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात, हे विशेष चिन्ह मानले जातात, ज्याचा संबंध नशिबाशी असल्याचे मानले जाते.
हस्तरेषाशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या छोट्या नखावर पांढरे डाग असणे हे चांगले मानले जाते. अशा लोकांना त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळते. त्याचप्रमाणे अशी लोक स्पष्टवक्ता आणि लवकर निर्णय घेणारे असतात, असे मानले जाते.
हातावरील मधल्या बोटांचा संबंध संपत्ती आणि सामाजिक स्थितीशी संबंधित असल्याचा मानला जातो. या बोटाच्या नखावर पांढरे डाग असण्याचा संबंध आर्थिक स्थितीशी संबंधित असतो. यावरुन असे लक्षात येते की, असे डाग असणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर असणे
अंगठ्यावर पांढरे डाग दिसण्याचा अर्थ असा होतो की, व्यक्तीला तीक्ष्ण व्यावसायिक समज असणे. हस्तरेषाशास्त्रानुसार, असे लोक व्यवहार, खरेदी-विक्री, रिअल इस्टेट किंवा व्यापारात यशस्वी होतात. त्यांच्याकडे नेतृत्वगुणदेखील असतात.
नखांवर सतत पांढरे डाग असणे म्हणजे पौष्टिकतेच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
असे मानले जाते की, या लोकांचे मानसिक असंतुलन किंवा सततची चिंता दर्शवते. असे लोक समस्येवर मात करण्यासाठी ध्यान आणि संतुलित जीवनशैलीची शिफारस केली जाते.
असे म्हटले जाते की, नखांवर पांढरे डाग केवळ तुमच्या सौंदर्यावर परिणाम करत नाहीत तर त्याचा अर्थ भविष्यामध्ये आरोग्य, आर्थिक स्थिती आणि कल्याणाशी देखील संबंधित असू शकतो. त्यामुळे तुम्हाला नखांवर असे डाग दिसत असल्यास त्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका. तसेच आपण हे संकेत समजून घेतल्यास आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. जाणूनबुजून असो वा नकळत, या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)