फोटो सौजन्य- pinterest
तुळशीचे रोप हे घरात ठेवणे शुभ आणि पवित्र मानले जाते. या रोपाला कौटुंबिक आनंद, शांती, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे आणि विष्णूच्या शक्तीचे प्रतीक म्हणून तिची पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाजवळ काही गोष्टी ठेवल्यास घरामधील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. यामुळे तुमची प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. तसेच तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. त्यासोबतच तुळशीच्या रोपाची नियमित काळजी घेणे आणि घरामध्ये योग्य दिशेने ठेवणे आणि रोपाजवळ काही वस्तू ठेवण्याला विशेष महत्त्व आहे.
घरामध्ये तुळशीचे रोप ठेवल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरातील वातावरण देखील शुद्ध होते. त्यासोबतच घरामध्ये तुळशीजवळ अशा काही वस्तू ठेवल्याने आर्थिक लाभ देखील होतो. वास्तुनुसार घरात संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धी येण्यास मदत होते. जाणून घ्या तुळशीच्या रोपाजवळ कोणत्या गोष्टी ठेवाव्यात.
शालिग्राम हे विष्णूचे प्रतीक मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ शालिग्राम ठेवल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढते. या उपायामुळे व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणी नशिबाची साथ मिळते अशी मान्यता आहे. हा उपाय करणे विशेषतः फायदेशीर मानला जातो.
प्राचीन काळापासून हळदीचा वापर करणे शुभ मानले जाते. तुळशीच्या झाडाजवळ हळद ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. यामुळे व्यक्तीची संपत्ती आणि मालमत्ता वाढण्यास मदत होते. हा उपाय केल्याने व्यक्तीला जीवनात सकारात्मक परिणाम होताना दिसून येतात.
तुळशीच्या रोपाला दूध अर्पण केल्याने झाड आणि घर दोन्ही शुद्ध राहते. या दोन्ही गोष्टी घरातील ऊर्जा शुद्ध करत नाही तर आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी देखील फायदेशीर मानल्या जातात. तसेच या उपायामुळे प्रलंबित कामे देखील वेळेवर पूर्ण होण्यास मदत होते.
वास्तुशास्त्रात गोमती चक्राला शुभ आणि सशक्त मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ हे चक्र ठेवल्याने घरात धन, सौभाग्य आणि समृद्धी येते. आर्थिक किंवा कामाशी संबंधित अडचणींना तोंड देणाऱ्यांनी हा उपाय करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते.
घरामध्ये तुळशीच्या रोपाजवळ काही जुनी किंवा नवीन नाणी ठेवल्यास संपत्तीमध्ये वाढ होते. हा उपाय केल्याने गुंतवणुकीमध्ये आणि आर्थिक लाभामध्ये फायदा होतो. तसेच रोपाजवळ ही नाणी ठेवण्याच्या पहिले कोमट पाण्याने नाणी स्वच्छ करुन घेणे देखील महत्त्वाचे मानले जाते.
तुळशीच्या रोपाजवळ लवंग आणि कापूर ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होते. यामुळे घरात आरोग्य आणि समृद्धी देखील वाढते.
तुळशीच्या रोपाजवळ लाल रंगांचे वस्त्र ठेवणे शुभ मानले जाते. हा उपाय केल्याने घरामध्ये ऊर्जा संतुलित राहण्यास आणि सुख समृद्धी येण्यास मदत करेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)