फोटो सौजन्य- pinterest
तळहाताच्या रेषेवर नशिबाचे चिन्ह लपलेले असते. हस्तरेखाशास्त्रानुसार, तळहातावरील रेषा आपल्या जीवनासंबंधित सर्व तपशीलवार सांगतात. तुमच्या तळहातावरील रेषेवरुन समजते की तुमच्याकडे किती संपत्ती असेल किंवा संपत्तीमध्ये कोणत्या समस्या येणार आहेत का, तुमचे वय किती असेल, लग्न कधी होईल किंवा लग्नात काही अडथळे समस्या असल्यास ते देखील समजते. तळहातावरील कोणते चिन्ह करोडपती होण्याचे संकेत देते, जाणून घ्या
एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर सूर्य पर्वताची रेषा असेल ती व्यक्ती भाग्यशाली मानली जाते. कारण अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये भरपूर संपत्ती मिळवण्याचे संकेत असतात. जे लोक करोडपती असतात अशा लोकांच्या तळहातावरील हृद्य रेषेचा वरचा भाग सामान्य लोकांपेक्षा खूप मोठा आणि श्रीमंत असतो. हृदय रेषा हाताच्या वरच्या बाजूला असते.
असे मानले जाते की, हृद्य रेषेमधून 3 किंवा 4 रेषा निघून सूर्य पर्वताकडे जातात. तळहातावरील रेषांवर त्रिकोण किंवा ब्लॉक तयार होतात अशा लोकांच्या तळहातावरील करोडपती होण्याची संधी असते. अशा व्यक्ती जीवनात करोडपती बनतात.
तुमच्या तळहातावर अंगठीच्या आकाराचा गोल तयार झाला असेल तर अशी लोक अब्जाधीश होण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. ज्या व्यक्तीच्या तळहातावर असे चिन्ह असल्यास अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. अशा लोकांना भाग्याची साथ लाभते.
धन त्रिकोणाला पैशाचा त्रिकोण असे म्हणतात. ज्या व्यक्तीच्या तळहातावर असा त्रिकोण असतो अशा व्यक्तींना कधीही पैशांची कमतरता भासत नाही. त्यांच्याकडे अमाप संपत्ती असते. या लोकांना मालमत्तेची कमी नसते.
ज्यावेळी धन रेषा, मस्तक रेषा आणि बुध रेषा जेव्हा एकमेंकाना मिळते तेव्हा धन त्रिकोण योग तयार होतो. जेव्हा या तिन्ही रेषा एकत्र येऊन मिळतात तेव्हा धन त्रिकोण योग तयार होतो. ज्यावेळी शनि रेषेजवळ धन रेषा असते त्यावेळी ती मधल्या बोटाच्या अगदी खालच्या बाजूला असते.
तळहातावर शुक्र, सूर्य आणि गुरू यांचे आरुढ मजबूत असतात आणि तळहातावर या उंच असल्यास ते करोडपती होण्याचे संकेत दर्शवले जाते. अशा व्यक्तींना श्रीमंत होण्यापासून कोणालाही अडवता येत नाही. हस्तरेखाशास्त्रानुसार अशा पर्वत रेषा श्रीमंत लोकांच्या तळहातावर आढळतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)