फोटो सौजन्य- istock
हस्तरेषाशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचे जीवन, स्वभाव आणि भविष्य त्याच्या हातावरील रेषेवरुन ओळखता येते. एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि व्यक्तिमत्व त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांची रचना पाहून जाणून घेता येते. प्रत्येकाच्या जिभेचा रंग, रचना आणि आकार वेगवेगळा असतो. व्यक्तीच्या जीवनातील बऱ्याच गोष्टीबद्दल समजते. जिभेवरुन व्यक्तीचे व्यक्तिमहत्तव आणि स्वभाव कसा असेल, जाणून घ्या
ज्या लोकांच्या जीभेचे स्पर्श नाकाला होतो असे लोक खूप भाग्यवान मानले जातात. अशी जीभ असलेल्या लोकांना नेहमीच भाग्य लाभते आणि त्यांना जीवनात मोठे यश देखील मिळते. तसेच असे लोक जीवनामध्ये खूप आनंदी देखील राहतात.
ज्या व्यक्तीची जीभ लाल, पातळ आणि खूप मऊ असते असे लोक खूप ज्ञानी मानले जातात. अशा लोकांना अभ्यासात खूप रस असतो आणि त्यांना सर्वत्र ज्ञान मिळवायला आवडते. त्याचबरोबर त्यांच्या बुद्धिमत्ता आणि हुशारीमुळे त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळते. त्यासोबतच ते कठीण परिस्थितीतून ते सहजरित्या बाहेर येतात. लाल आणि पातळ जीभ असलेले लोक सामान्यतः धार्मिक असतात.
ज्या मुलींची जीभ मऊ, लाल आणि पातळ असते त्या खूप भाग्यवान असतात. अशा मुलींना जीवनामध्ये सर्व सुख मिळतात. लग्नापूर्वी आणि नंतरचे त्यांचे जीवन नेहमीच आनंदी आणि शांत असते. ते त्यांच्या मेहनतीने आणि नशिबाच्या जोरावर त्यांच्या कारकिर्दीत चांगले स्थान मिळवतात आणि आनंदी जीवन जगतात.
असे मानले जाते की, ज्या मुलींची जीभ लाल असते त्यांना सर्वोत्तम जीवनसाथी मानली जाते. तसेच लग्नानंतरचे त्याचे आयुष्य खूप आनंदी राहील. या मुलींना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही त्यांची आर्थिक स्थितीही चांगली राहते. तर ज्या मुलींची जीभ जाड असते त्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
ज्या लोकांच्या जिभेचा पुढचा भाग टोकदार असतो आणि ती काही लांबीची असते त्यांना खूप फायदेशीर मानले जाते. हस्तरेषाशास्त्रानुसार, अशा लोकांना आयुष्यात खूप कमी दुःखांना सामोरे जावे लागते. अशा लोकांना जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि विलासिता मिळते त्यामुळे ते त्यांच्या कारकीर्दीत खूप उंची गाठतात आणि पैसे कमावतात त्यामुळे पैशाची समस्या देखील देखील दूर होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)