Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palmistry: तळहातावर या रेषा असल्यास मिळू शकते वक्तृत्व आणि लेखनात अपेक्षित यश

तळहातावर अनेक चिन्ह असतात त्याचा संबंध आपल्या व्यक्तिमहत्त्वाशी संबंधित असतो. महान वक्ता, लेखक किंवा शिक्षक बनण्याची चिन्हे तुमच्या तळहातावर आहेत का? या चिन्हांमुळे तुम्ही कोणत्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकतात हे सहज समजते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 22, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मस्तिष्क रेषा स्पष्ट आणि सरळ असल्यास बुद्धिमत्ता, विचारशक्ती आणि विश्लेषण क्षमता चांगली असल्याचे मानले जाते.
  • भाग्यरेषा मजबूत असल्यास करिअरमध्ये स्थैर्य आणि प्रगतीचे संकेत मानले जातात.
  • बुध पर्वतावर उभ्या रेषा असल्यास वक्तृत्व आणि संवादकौशल्याशी त्यांचा संबंध
काही लोक आपल्या कल्पना इतरांना सहजपणे समजावून सांगू शकतात, तर काहींना स्वतःला योग्यरित्या व्यक्त करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. काहींमध्ये अत्यंत क्लिष्ट विषयसुद्धा सोप्या शब्दांत मांडण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे, काही लोकांकडे नाविन्यपूर्ण कल्पना असतात, काही जण उत्कृष्ट लिहितात, काही जण आपल्या शब्दांनी इतरांना प्रभावित करतात आणि काही जण अगदी कठीण समस्याही क्षणार्धात सोडवू शकतात. हस्तरेखाशास्त्रानुसार, व्यक्तींमधील हे गुण तळहातावरील रेषा आणि उंचवट्यांमुळे असतात. या रेषा आणि उंचवटे एखाद्या व्यक्तीला उत्तम वक्ता, लेखक, शिक्षक इत्यादी बनण्यास मदत करू शकतात. वक्तृत्व आणि लेखनात अपेक्षित यश कोणत्या रेषांमुळे समजते ते जाणून घ्या

लांब आणि स्पष्ट मस्तिष्क रेषा

हस्तरेखाशास्त्रानुसार मस्तक रेषा ही विचार करणे, शिकणे, नियोजन करणे आणि मानसिक क्षमतेशी संबंधित आहे. लांब, स्पष्ट आणि सुस्पष्ट रेषा विचार प्रभावीपणे संघटित करण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता दर्शवतात. अशा व्यक्तींमध्ये गोष्टी व्यवस्थित लावण्याची, नोंदी घेण्याची, समस्यांवर उपाय शोधण्याची आणि क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची क्षमता असते. हे गुण लेखन, अध्यापन आणि प्रशिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरतात. दरम्यान, जर मस्तक रेषा किंचित खाली झुकलेली असेल, तर हस्तरेखाशास्त्रानुसार तिचा संबंध कल्पनाशक्तीशी जोडला जातो. अशा व्यक्ती सृजनशील लेखन, कल्पनात्मक अभिव्यक्ती, कथाकथन, कविता आणि पटकथा यांसारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करू शकतात.

Vastu Dosh: फ्लॅटमधील वास्तुदोष दूर करण्यासाठी तोडफोडीची गरज नाही, जाणून घ्या हे सोपे उपाय

बुध पर्वताकडील रेषा

तळहातावर करंगळीच्या खाली असलेल्या भागाला ‘बुध पर्वत’ म्हणतात. हस्तरेखानुसार, हा भाग संवाद, भाषा, आकलनशक्ती, व्यावसायिक चातुर्य आणि लोकांशी संवाद साधण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे. जर मस्तक रेषेपासून निघणाऱ्या लहान फांद्या बुध पर्वताकडे जाताना दिसल्या, तर ते भाषा आणि संवाद कौशल्याचे लक्षण मानले जाते. अशा व्यक्ती इतरांना पटवून देण्यात, वाटाघाटी करण्यात किंवा प्रभावित करण्यात पारंगत मानल्या जातात. अशा व्यक्तींना अनेकदा शिक्षक, लेखक, पत्रकार, वकील, समुपदेशक, विक्री व्यावसायिक, कंटेंट क्रिएटर आणि प्रशिक्षक यांसारख्या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळते.

मजबूत सूर्य रेखा

हस्तरेखाशास्त्रानुसार, तळहातावरील सूर्य रेषा ही ओळख, प्रसिद्धी, सर्जनशीलता आणि प्रतिभेच्या अभिव्यक्तीशी संबंधित आहे. जर ही रेषा तळहातावर ठळक असेल, तर त्या व्यक्तीच्या कार्याला किंवा प्रतिभेला इतरांकडून ओळख मिळण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती अनेकदा लेखन, कला, आवाज अभिनय, रंगमंच किंवा सार्वजनिक भूमिकांशी संबंधित असतात. अशा लोकांना सुरुवातीला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पण कालांतराने त्यांना एक चांगले व्यासपीठ मिळते, ज्यासाठी ते मेहनत करतात.

नियती रेषेपासून वरच्या दिशेने पसरलेल्या रेषा

हस्तरेखाशास्त्रामध्ये भाग्य रेषेपासून निघणाऱ्या लहान, वरच्या दिशेने जाणाऱ्या शाखांना महत्त्वपूर्ण मानले जाते. जर अशा शाखा बुध, गुरू किंवा सूर्य पर्वताकडे विस्तारत असतील, तर त्या ज्ञान, संवाद, अध्यापन, मार्गदर्शन किंवा सृजनशील अभिव्यक्तीशी संबंधित करिअरच्या संधी दर्शवतात. या रेषांना केवळ जन्मजात प्रतिभेचा पुरावा मानू नये. प्रतिभेसोबतच सराव, आत्मविश्वास, योग्य संधी आणि सातत्यपूर्ण कठोर परिश्रम यांनाही हस्तरेखाशास्त्रात महत्त्वाचे मानले जाते.

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे …

तुमच्या देखील तळहातावर ही चिन्हे आहेत का

जर तुमच्या तळहातावर एक लांब आणि स्पष्ट मस्तक रेषा असेल, जी बुध पर्वताकडे फाटे फुटत असेल, एक स्पष्ट बुध रेषा, एक सशक्त सूर्य रेषा किंवा वरच्या दिशेने जाणारी भाग्य रेषा असेल, तर अशी व्यक्ती सर्वांना प्रभावित करू शकते. हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, अशा व्यक्तींमध्ये स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करण्याची, लिहिण्याची, शिकवण्याची किंवा इतरांना पटवून देण्याची उत्कृष्ट क्षमता असते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तळहातावरील रेषांवरून व्यक्ती वक्ता किंवा लेखक होऊ शकते का?

    Ans: हस्तरेषाशास्त्रानुसार काही रेषा आणि पर्वतांचा संबंध वक्तृत्व, लेखन आणि संवादकौशल्याशी जोडला जातो. मात्र याला वैज्ञानिक आधार नाही.

  • Que: लेखन कौशल्यासाठी कोणती रेषा पाहिली जाते?

    Ans: मस्तिष्क रेषा विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि बौद्धिक क्षमतेशी संबंधित मानली जाते. त्यामुळे लेखनकौशल्याचा अंदाज घेताना या रेषेचा विचार केला जातो.

  • Que: शिक्षक होण्यासाठी तळहातावर कोणते संकेत पाहिले जातात?

    Ans: बुध पर्वत, मस्तिष्क रेषा आणि इतर प्रमुख रेषांचा एकत्रित विचार केला जातो. संवादकौशल्य आणि ज्ञान मांडण्याची क्षमता यांना विशेष महत्त्व दिले जाते.

Web Title: Palmistry this line on the palm brings expected success in oratory and writing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • dharm
  • palmistry
  • religions

संबंधित बातम्या

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व
1

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व

Masik Shivratri: ८ की ९ ऑक्टोबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Masik Shivratri: ८ की ९ ऑक्टोबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Hindu Religion: अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर आंघोळ का केली जाते, जाणून घ्या यामागील कारण
3

Hindu Religion: अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर आंघोळ का केली जाते, जाणून घ्या यामागील कारण

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.