फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, पंचक सुरु असताना सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे मानले जाते. यावेळी ही 5 कामे करणे निषिद्ध मानले जाते. ज्यामुळे कोणतीही अशुभ घटना घडत नाही. तसेच कोणत्याही समस्येंना तोंड द्यावे लागत नाही.
हिंदू धर्मामध्ये पंचक काळ खूप अशुभ मानला जातो. जो चंद्राच्या धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्रांमध्ये तयार होणारे संक्रमण. हा काळ 5 दिवसांचा असतो. यावेळी कोणतीही शुभ कामे करण्यास मनाई केली जाते. असे मानले जाते की, कोणतीही शुभ कामे केल्यास त्याचे अशुभ परिणाम मिळतात. यावेळी राजपंचक हा शुभ मानला जात असला तरी यावेळी काही शुभ कामे केली जाऊ शकतात.
पंचांगानुसार, आज सोमवार, 16 जूनपासून राजपंचक सुरु होत आहे. हे पंचक आज सकाळी 11.32 वाजता सुरु झाले असून त्याची समाप्ती शुक्रवार, 20 जून रोजी संध्याकाळी 6.49 वाजता होईल. जून महिन्यातील पंचकांचा कालावधी सोमवारपासून सुरु होत असल्याने त्याला राज पंचक असे म्हटले जाते. काही कामांसाठी हे पंचक शुभ मानले जाते.
धनिष्ठ नक्षत्रामध्ये लाकूड किंवा इंधन गोळा करणे, खरेदी करणे अशुभ मानले जाते. असे केल्यास आगीची भीती जास्त असते. आगीच्या संबंधित अपघातांची भीती जास्त असते.
दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवेश करणे धोकादायक मानले जाते. यावेळी तुम्हाला प्रवासात मोठे अडथळे येणे, अपघात होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आवश्यक असल्यास या दिशेला प्रवास करताना हनुमानजींना 5 फळे अर्पण करुन प्रवास करावा.
पंचक काळातील रेवती नक्षत्रामध्ये घरावर छप्पर घालणे किंवा एखादे बांधकाम करणे अशुभ मानले जाते. असे केल्यास घरामध्ये आर्थिक नुकसान आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
पंचक काळामध्ये पलंग, खाट किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तू तयार करणे अशुभ मानले जाते. यामुळे परिवारातील लोकांवर मोठे संकट उद्भवण्याची शक्यता जास्त असते.
पंचकातील सर्वात महत्वाचे आणि निषिद्ध असे कृत्य म्हणजे अंत्यसंस्कार. मान्यतेनुसार, पंचक काळामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास या काळात अंत्यसंस्कार केले गेल्यास त्या परिवारातील किंवा जवळच्या नातेवाईकांमधील आणखीन 5 लोकांचे मृत्यू होण्याची शक्यता असते. अशी परिस्थिती उद्भवल्यास पंडितांकडून शांती करुन घेऊन अंत्यसंस्कार करावे.
पंचकामध्ये काही शुभ कामे करणे अशुभ असले तरी जून महिन्यात येणाऱ्या राजपंचकामध्ये काही कामं करणे शुभ मानली जातात. राजपंचकामध्ये सरकारी आणि राजकारणाशी संबंधित काम करणे शुभ मानले जाते. त्यासोबतच मालमत्तेशी संबंधित इतर कामेही करणे फायदेशीर ठरते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)