फोटो सौजन्य- istock
हिंदू धर्मामध्ये पंचकाचा कालावधी अशुभ मानला जातो. यावेळी शुभ कार्य करण्यास मनाई करण्यात येत आहे. पाच नक्षत्रांच्या (धननिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती) संयोगाने तयार होतो. यादरम्यान काही कामे अशुभ मानले जाते. वेगवेगळ्या दिवशी सुरू होणाऱ्या पंचकला वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. त्याचसोबत रविवारी सुरू होणाऱ्या पंचकाला रोग पंचक असे म्हणतात. दर महिन्याला पाच दिवस पंचक साजरा केला जातो आणि या काळात विशेष काळजी घेतली जाते.
पंचांगानुसार, पंचकची सुरुवात रविवार, 10 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजून 11 मिनिटांनी होत आहे. या पंचकांची समाप्ती गुरुवार, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी होणार आहे. या पंचकाची सुरुवात रविवारी होत असल्याने त्याला रोग पंचक म्हटले जाईल. हा काळ अशुभ मानला जाणार आहे.
ज्योतिशस्त्राच्या म्हणण्यानुसार, या काळामध्ये नवग्रहातील चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. एक राशीत अडीच दिवस घालवल्यानंतर गोचर करतो. 27 नक्षत्रांचा अधिपती असलेला हा ग्रह प्रत्येक दिवशी नक्षत्र बदल करतो. त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो.
ज्योतिषशास्त्रात, रोग पंचक हा एक विशेष प्रकारचा पंचक आहे. ज्याची सुरुवात रविवारपासून होत आहे. या काळामध्ये व्यक्तीला पाच दिवस शारीरिक आणि मानसिक ताण येऊ शकतो. रोग पंचकाचा काळ शुभ कार्यांसाठी चांगला काळ मानला जात नाही त्यामुळे त्याला अशुभ पंचक असे म्हणतात.
पंचक काळात काही कामे करणे अशुभ मानले जातात. या काळामध्ये घर बांधणे, दक्षिण दिशेला प्रवास करणे, अंत्यसंस्कार करणे आणि लाकूड गोळा करणे किंवा वापरणे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त लग्न, साखरपुडा, नामकरण, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी शुभ कामे या काळात करु नये.
पंचक काळात गृहप्रवेश करणे निषिद्ध मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, घरात प्रवेश विशेष परिस्थितीत आणि नक्षत्रांमध्ये केला जाऊ शकतो.
पंचक काळात भूमिपूजन करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात पंचकाचा संबंध शुभ आणि अशुभ कामांशी संबंधित आहे, परंतु भूमिपूजनासारखी कामे देखील पंचक काळात करता येतात.
धार्मिक मान्यतेनुसार, पंचक काळात केस कापू नयेत. याशिवाय, पंचकदरम्यान नखे कापणे आणि दाढी करणे देखील टाळावे.
पंचक काळात कपडे खरेदी करता येतात. या काळात कपडे खरेदी करणे, मनोरंजनाशी संबंधित कामांमध्ये सहभागी होणे. या गोष्टी पंचक काळात केल्या जाऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)