फोटो सौजन्य- pinterest
आजचा रविवारचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खास राहणार आहे. आजचा दिवस सूर्य देव असेल तर गुरुची चंद्रावर नववी दृष्टी असेल. धनिष्ठेनंतर शतभिषा नक्षत्राच्या संयोगाने शोभन आणि द्विपुष्कर योग तयार होणार आहे. शुक्र मिथुन राशीत युती करत असल्याने गजलक्ष्मी योग तयार होईल. द्विपुष्कर योग आणि सूर्यदेवाच्या कृपेमुळे आजचा दिवस वृषभ, कर्क, कन्या, तूळ, मकर राशींसाठी फायदेशीर राहील. या राशीच्या लोकांना अपेक्षित लाभ मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मकर राशीसह इतर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार राहील. व्यवसायात तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल आणि तुमच्या कामाला गती मिळेल. तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करण्यास मदत होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुमची सर्व कामे यशस्वी होतील. कोणतेही अडकलेली कामे तुमची पूर्ण होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्ही जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करु शकता. मालमत्तेबाबत वाद असल्यास ते दूर होतील. नवीन कामाची सुरुवात करु शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला येऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. पैसे कमाविण्याच्या संधी मिळतील. मालमत्तेशी संबंधित कामात चांगला नफा मिळू शकेल. सामाजिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना प्रतिष्ठा मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला राहणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आज कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. दीर्घकालीन गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते मजबूत होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)