Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parivartini Ekadashi 2025: 2 की 3 सप्टेंबर परिवर्तिनी एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व

परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहे. या योगामध्ये लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. एकादशीच्या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 01, 2025 | 09:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

सनातन धर्मामध्ये भाद्रपद महिन्याला विशेष महत्त्व आहे. यावेळी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. राधा राणीचा अवतार दिवस शुक्ल पक्षात साजरा केला जातो. तसेच भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवही साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात अनेक मोठे व्रत आणि सण साजरे केले जातात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी किंवा जलझुलणी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. परिवर्तिनी एकादशी कधी आहे, जाणून घ्या

कधी आहे परिवर्तिनी एकादशी

पंचांगानुसार, परिवर्तिनी एकादशी तिथीची सुरुवात बुधवार, 3 सप्टेंबर रोजी पहाटे 3.53 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी पहाटे 4.21 वाजता होईल. उद्यतिथीनुसार परिवर्तिनी एकादशीचे व्रत बुधवार, 3 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे.

September Festival 2025: सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी जाणून घ्या

परिवर्तिनी एकादशी पूजा पद्धत

परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंची पूजा करावी. शक्यतो एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून आवरुन घ्यावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करुन पूजा करुन घ्यावी. विष्णूची मूर्ती किंवा चित्र एका चौरंगावर किंवा पाठावर स्थापित करावे. त्यानंतर नैवेद्य म्हणून पिवळी फुले, तुळशीची पाने, तांदळाचे दाणे, रोली, चंदन आणि मिठाई किंवा फळे इत्यादी गोष्टी अर्पण कराव्यात. तसेच परिवर्तिनी व्रताची व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी. त्यानंतर विष्णूची आरती आणि मंत्रांचा जप करा. ॐ नमो भगवते वासुदेवाय जप करणे खूप शुभ मानले जाते. त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार गरजूंना काही वस्तूंचे दान करा. या दिवशी अन्न, कपडे किंवा पैसे दान करणे पुण्याचे काम मानले जाते.

Zodiac Sign: रवि योग आणि महादेवांच्या आशीर्वादाने कर्क राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल प्रगतीची संधी

परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व

जी व्यक्ती परिवर्तिनी एकादशीचे व्रत करते त्या व्यक्तीला अनेक फायदे होतात. शास्त्रांमध्ये या व्रताला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. असे मानले जाते की, या व्रताच्या दिवशी व्यक्तीने उपवास केल्यास जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो. हे व्रत केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सुख-समृद्धी येते आणि जीवनात सौभाग्य वाढते. त्यामुळे हे व्रत खूप फायदेशीर मानले जाते. जे भक्त हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने पाळतात, त्यांना हजार अश्वमेध यज्ञांसारखेच पुण्यपूर्ण फळ मिळते. या दिवशी भगवान विष्णूंसोबत वामन अवताराचीही पूजा केली जाते. मान्यतेनुसार, वामनाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे आणि कष्ट दूर होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Parivartini ekadashi 2025 when is parivartini ekadashi shubh muhurt importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar: 15 मे रोजी बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांनी राहावे सावध
1

Budh Gochar: 15 मे रोजी बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

Saint Savatmali: “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” असे अभंग म्हणणारे संत कोण होते? जाणून घ्या
2

Saint Savatmali: “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” असे अभंग म्हणणारे संत कोण होते? जाणून घ्या

Ekadashi: एकादशीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा का करावा जप, जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Ekadashi: एकादशीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा का करावा जप, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Shani Jayanti 2026: शनि जयंतीला चंद्राच्या दुहेरी संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा
4

Shani Jayanti 2026: शनि जयंतीला चंद्राच्या दुहेरी संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.