फोटो सौजन्य- pinterest
आज गुरुवार, 9 ऑक्टोबरचा दिवस आणि आज अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षामधील तृतीया तिथी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज चंद्र मेष राशीमधून संक्रमण करणार आहे. शुक्र आज कन्या राशीमध्ये संक्रमण करणार आहे त्यामुळे शुक्रादित्य योग तयार होईल. तसेच भरणी नक्षत्रामुळे अनाफा आणि धन योग देखील तयार होणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस वृषभ, कन्या, वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. शुक्रादित्य योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होईल, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. जर तुम्हाला वाहन किंवा लक्झरी वस्तू खरेदी करण्याची इच्छा असल्यास आजचा दिवस चांगला आहे. मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. फॅशन आणि सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय करणाऱ्यांना आज फायदा होऊ शकतो.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या कामात गुंतलेल्या लोकांच्या उत्पन्नात अचानक वाढ होईल. सरकारी क्षेत्रात असणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुम्हाला कामावर प्रोत्साहन देऊ शकतात आणि तुमच्या प्रतिष्ठेत वाढ झाल्याने तुम्हाला फायदा होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि हुशारीने तुमच्या विरोधकांना पराभूत करू शकाल. तुम्हाला मालमत्ता किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. यावेळी तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. आज तुम्ही नवीन प्रकल्पांची सुरुवात करु शकतात. तुमच्यासाठी व्यवसायात फायदेशीर असेल. कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामाशी संबंधित प्रवासही यशस्वी होईल.
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. मार्केटिंग आणि सेल्समध्ये गुंतलेल्या किंवा भेटवस्तू आणि फॅशनमध्ये गुंतलेल्यांना त्यांच्या कामात अपेक्षित यश मिळेल. एखाद्या वरिष्ठांच्या मदतीचा फायदा होईल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचाही फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)