फोटाो सौजन्य- pinterest
दोन ग्रह एकमेंकाच्या सहाव्या आणि आठव्या घरात असतात तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग अशुभ मानला जातो. शनिवार, 7 जून रोजी मंगळ सिंह राशीत संक्रमण करणार आहे. ज्यामुळे मंगळ आणि शनि यांच्यामध्ये हा योग निर्माण होईल. या योगामुळे तणाव, संघर्ष, आजारपण आणि नुकसान असे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. ही परिस्थिती २८ जूनपर्यंत सक्रिय राहील, जेव्हा मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल आणि हा योग संपेल. यावेळी मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण आव्हाने वाढू शकतात.
या योगादरम्यान काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. विशेषतः ज्यांचे ग्रह त्यावर प्रभाव पाडतात. या काळात व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अनावश्यक वाद, तणाव आणि गोंधळ निर्माण होऊ शकतात. तसेच काही राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कर्क राशीच्या लोकांना षडाष्टक योगाचा परिणाम जाणवू शकतो. यावेळी दैनंदिन दिनशर्या अधिक धावपळीची होऊ शकते, मग ती मुलांच्या जबाबदाऱ्यांशी संबंधित असो किंवा ऑफिस आणि व्यवसायाच्या कामाशी संबंधित असो. या सर्व गोष्टींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे. कारण अनियमित आणि चुकीच्या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कोणतीही गुंतवणूक करताना किंवा आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो. एखाद्याला पैसे उधार देताना काळजी घ्यावी लागेल, कारण पैसे परत न मिळण्याचा धोका असतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी. व्यावसायिकांनी सुद्धा सावधगिरी बाळगावी. व्यवसायिकांनी उधारीवर वस्तू देणे किंवा अनियोजित व्यवसाय सहली टाळाव्यात, आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे. तणावपूर्ण वातावरणामुळे मानसिक ताण वाढू शकतो, म्हणून कामात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.
मीन राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात तणाव आणि वादांचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे मानसिक ताण आणखी वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. गाडी चालवताना विशेष काळजी घ्या कारण अपघात किंवा दुखापत होण्याची शक्यता वाढते. या काळात शांत राहणे आणि मानसिक शांती राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)