फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतो. घर बांधताना आणि घरात वेगवेगळ्या वस्तू ठेवताना वास्तुचे नियम पाळले तर कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे, ज्यामध्ये घराच्या आत चित्रे लावण्यासाठी शुभ स्थाने आणि दिशानिर्देश देखील सांगितले आहेत. असे मानले जाते की, पती-पत्नीचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी वास्तुच्या नियमांचे पालन केले पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घरात स्वतःचा आणि तुमच्या जोडीदाराचा फोटो लावला तर प्रथम योग्य दिशा आणि वास्तुच्या काही महत्त्वाच्या नियमांची काळजी घ्या.
पती पत्नी अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या घरात फोटो लावतात. वास्तुशास्त्रानुसार, काही ठिकाणी पती-पत्नींचा फोटो लावणे शुभ मानले जात नाही. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. असे मानले जाते की, घरामध्ये पती पत्नीचे फोटो कधीही दक्षिण दिशेला लावू नये. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा यमराज आणि पूर्वजांची मानली जाते. दक्षिण दिशेला फोटो लावल्यास दोघांना जीवनात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीचा फोटो योग्य दिशेने लावल्यास दोघांमधील नाते नेहमीच मजबूत राहते आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो. मान्यतेनुसार दोघांचा फोटो नैऋत्य दिशेला कोपऱ्यात लावावा. नैऋत्य कोपऱ्यात पती पत्नीचा फोटो लावणे सर्वोत्तम मानले जाते. ऋत्य कोपऱ्याव्यतिरिक्त, तुम्ही पती-पत्नीचा फोटो उत्तर दिशेला देखील लावू शकता. असे केल्याने दोघांमधील नात्यात गोडवा येतो आणि समन्वय अबाधित राहतो.
घरामध्ये फोटो लावण्यापूर्वी दिशेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रात, घरात काही ठिकाणी पती-पत्नीचा फोटो लावणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की कधीही जोडप्याचा फोटो त्यांच्या बेडसमोर लावू नये. तसेच देव्हारा, बाथरुमच्या समोर पती पत्नीचा फोटो लावू नये. या ठिकाणी पती-पत्नीचा फोटो लावल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार, घरात काही ठिकाणी पती-पत्नीचा फोटो लावणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जोडप्याचा फोटो कधीही तुमच्या बेडच्या अगदी समोर ठेवू नये.
बऱ्याचदा लोक त्यांचे अनेक फोटो एकत्र लावतात. असे करणे योग्य मानले जात नाही. यामुळे घरात समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार, एक किंवा दोन फोटो नेहमी तुमच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा बेडरूममध्ये लावावेत. घरात जोडप्याचा फोटो लावल्याने सकारात्मक ऊर्जा पसरते. तसेच, फोटो लावताना, त्याची फ्रेम तुटलेली किंवा फिकट रंगाची नसावी हे लक्षात ठेवा. असे फोटो लावल्याने घरात नकारात्मकता येऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)