महाभारत म्हटलं की कौरव आणि पांडवाचं युद्ध प्रकर्षाने जाणवतं. महाभारतातील युद्ध केवळ सत्तासंघर्ष आहे. सत्ता, प्रतिष्ठेचा मोहापायी अनेक निरपराधांचे बळी गेले होते. या युद्धात कौरवांच्या बाजूने निष्ठेने लढणारे देवव्रत यांना महाभारतील सर्वात अनुभवी योद्धा मानलं जातं. खरंतर कुरुक्षेत्राचा विस्तारच या देवव्रताने केला होता. कुरुसाम्राज्यातील या अनुभवी योद्धाची माहिती जाणून घेऊयात.
हस्थिनापूरचा राजा शांतनू हा मोठा पराक्रमी आणि प्रजेवर अपार प्रेम करणारा होता. हस्थिनापूरात एकदा राक्षसकुळातील सैन्यांची उतमात करायला सुरुवात केली. त्यावेळी याचा प्रजेला मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागला. शांतनू राजाची प्रजा यातनेनं व्हिवळत होती मात्र राक्षसवंशाला कोणत्याही प्रकारे दया माया येत नव्हती. त्यावेळी एक बलदंड बाहूंचा योद्धा राक्षसांना एकटा पुरुन उरला. त्यावेळी राक्षसांनी सांगितलं की भारतवंशीय राक्षसभूमीत येऊन त्रास देतात. त्यावर या योद्ध्याने राक्षसी सैन्य़ाला वचन दिलं की, यापुढे कोणी भारतवंशीय तुमच्या भूमीत येणार नाही तुम्हाला त्रास देणार नाही. या वचनानंतर राक्षसांनी प्रजेला सोडून दिलं. त्यानंर राजा शांतनू हा त्याच्या असंख्य सैन्य़ासह राक्षसांशी युद्ध करण्यास सरसावला. त्यावेळी राक्षस असं पुन्हा करणार नाही असं वचन त्यांनी दिलं आहे त्यामुळे त्यांना सोडून द्यावं असं या योद्धाने राजा शांतनूला सांगितलं. मात्र यावर राजा भडकला.
मला अडवणारा तू कोण? मी या राक्षसांना जाऊ देणार नाही. असं राजा शांतनू त्या योद्धाला म्हणाला. त्यानंतर हा योद्धा राजाला म्हणाला की माता गंगा या राक्षसांना वाट मोकळी करुन देईल. या योद्ध्याने आकाशाच्या दिशेला धनुष्यबाण धरलं त्यानंतर त्याने सुटलेल्या असंख्य बाणांमुळे गंगेचा प्रवाह खंडित झाला आणि वाट मोकळी झाली. माता गंगेने या योद्ध्याचं ऐकल्यानंतर राजा आश्चर्यचकित झाला. त्यावेळी गंगा अवतरली आणि तिने राजाला या योद्धयाची ओळख करुन दिली.
गंगामाई म्हणाली राजा शांतनू हा योद्धा माझा आणि तुमचा पुत्र देवव्रत आहे. जेव्हा तो य़ुद्धा म्हणून सक्षम होईल तेव्हाच त्याची आणि तुमची भेट होईल आणि झाली आहे. असं म्हणून गंगा अंतर्धन पावली. राजा शांतनूने आपला उत्तराधिकारी म्हणून देवव्रताला राजा म्हणून घोषित केलं. त्यावेळी राजा शांतनूच्या मनात एक वेगळं दुख होतं. राजा शांतनूला मत्सकन्या देवी सत्यवती हिच्यावर प्रेम जडलं होतं. मात्र मी तुमच्या मुलाची सावत्र आई होणार नाही, भविष्यात माझी मुलं सिंहासनावर विराजमान होणार असतील तरच मी विवाह करेन. देवी सत्यवतीची ही अट देवव्रताला कळताचं त्याने गंगेच्या पाण्यात भीष्म प्रतिज्ञा घेतली. त्याने सिंहासन आणि राज्यावरचा आपला हक्क सोडला ते केवळ वडीलांना त्यांचं प्रेम मिळावं यासाठी. मुलाचा त्याग पाहून शांतनू राजाने देवव्रताला इच्छित मरणाचा वर दिला. भीष्म प्रतिज्ञा केल्याने देवव्रताला पुढे भीष्म या नावाने ओळखले जाऊ लागले. पितामह भिष्म यांनी आजन्म ब्रम्हचारी असण्याचं व्रत पाळलं. कुरुक्षेत्राचा विस्तार करण्यात भीष्मांचा मोलाचा वाटा आहे.