फोटो सौजन्य- pinterest
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी दान, पूजा आणि पितृपूजेला विशेष महत्त्व आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून काही वस्तूचे दान करण्याची देखील श्रद्धा आहे. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या आणि अडथळे दूर होण्यास मदत होते. यावेळी पिठोरी अमावस्या शनिवार, 30 ऑगस्ट रोजी आहे. अमावस्या शनिवारी येत असल्याने त्याला शनि अमावस्या देखील म्हटले जाते.
असे म्हटले जाते की, अमावस्येला दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. त्यामुळे या दिवशी तांदूळाचे दान करणे शुभ मानले जाते. तांदुळाचे दान केल्याने घरातील समस्येपासून सुटका होते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते. या गोष्टींचे दान केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते, अशी देखील मान्यता आहे.
शनि अमावस्या ही न्यायदेवता शनिदेवांना समर्पित आहे. या दिवशी तिळाचे दान केल्याने शनिदोषापासून देखील सुटका होते. त्यासोबतच अकाली मृत्यूची भीतीदेखील दूर होते. तसेच या उपायामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये यशाचे नवीन मार्ग उघडले जातात.
पिठोरी अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तींना छत्रीचे दान करु शकता. यामुळे शनिदेवाची कृपा राहून जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते. छत्रीचे दान केल्याने व्यक्ती कामातील अडथळे दूर करू शकते आणि व्यवसायात प्रगती करू शकते. तसेच राहू केतू आणि शनि दोषापासूनही त्याची सुटका होते.
तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणीत असाल तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना उडीद डाळ दान करा. हे दान केल्याने व्यक्तीला कधीही जीवनात पैशाची कमतरता भासत नाही, तसेच आर्थिक स्थिती देखील मजबूत होते. उडदाची डाळ दान केल्याने संपत्तीत वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
पिठोरी अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तीला काळे बूट दान करावे. कारण शनि ग्रहाचा संबंध काळा रंगांशी आहे. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुर्दैव दूर होण्यास मदत होते. त्यामुळे शनि अमावस्येच्या दिवशी काळ्या गोष्टीचे दान केल्याने व्यक्तीचे नशीब बदलते आणि जीवनातून नकारात्मकता देखील दूर होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)