फोटो सौजन्य- pinterest
शुक्र ग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे होतो. भौतिक सुख, प्रेम, वैवाहिक सुख, सौंदर्य आणि समृद्धी मिळते. तर शुक्र ग्रहाला सर्वांचा कारक मानला जातो. शुक्राच्या कृपेमुळे व्यक्तीच्या जीवनात कायम आनंदच येतो. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांसाठी आज होणारे हे संक्रमण फायदेशीर राहणार आहे. पंचांगानुसार, गुरुवार 21 ऑगस्ट रोजी पहाटे 1.25 वाजता शुक्र ग्रहाने कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे ज्याचा कर्ता चंद्र आहे. कर्क राशीमध्ये शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांमधील घरगुती समस्या, आनंद, संपत्ती, समृद्धी आणि व्यक्तिमत्त्वात वाढ होण्यास मदत होईल. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण त्याच्या कुंडलीमध्ये पहिल्या घरामध्ये होणार आहे. ज्याचा संबंध व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी, आरोग्याशी, शारीरिक रचना आणि आत्मविश्वासाशी संबंधित असेल. या संक्रमणामुऴे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. या काळात व्यक्तीचा आत्मविश्वास वाढलेला राहील. अविवाहित लोक नात्यात अडकण्याची शक्यता आहे. नात्याची नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. सर्जनशील क्षेत्रांशी संबंधित लोक त्यांच्या कामावर समाधानी राहतील आणि ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल.
तूळ राशीच्या लोकांना शुक्र ग्रहांचे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. हे संक्रमण तुमच्या कुंडलीमध्ये दहाव्या घरामध्ये होणार आहे. ज्याचा संबंध कर्म, करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेशी आहे. हे संक्रमण व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणू शकते. या काळात समाजकल्याणासाठी काम केल्यास तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. त्यासोबतच करिअरमधील अस्थिरता दूर होईल. एखाद्याच्या प्रभावशाली व्यक्तीच्या सहवासामुळे तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांचे सगळीकडे त्याच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल आणि त्यांना पैसे कमविण्याच्या संधी मिळतील.
शुक्र ग्रहाचे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. हे संक्रमण या राशीमध्ये पाचव्या घरात होणार आहे. या संक्रमणाचा संबंध मुलांशी, शिक्षणाशी, प्रेमाशी आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे. या संक्रमणामुळे घरगुती जीवनात आनंद वाढवेल. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होतील. मुलांबद्दल काही चिंता असल्यास ती दूर होऊ शकते. नवीन नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात लेखन, कला आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या प्रतिभेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)