फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत महादेवांना खूप प्रिय असल्याचे मानले जाते. यावेळी महादेवाची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हे व्रत श्रावण महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते. यावेळी शिवलिंगावर दोन वस्तू अर्पण केल्याने ग्रहाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतात. त्यासोबतच येणारे कोणतेही संकट पाळले जात नाही. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात, जाणून घ्या
यावेळी श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत बुधवार, 6 ऑगस्ट रोजी आहे. महादेवांचे आवडते प्रदोष व्रत आहे. तसेच त्यांची विधीवत पूजा करुन काही गोष्टी अर्पण केल्यास भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते. तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने कोणत्याही समस्या उद्भवत नाही.
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात बुधवार, 6 ऑगस्ट रोजी दुपारी 2.37 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता होणार आहे. कारण प्रदोष काळामध्ये शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. त्यामुळे हे प्रदोष व्रत बुधवार, 6 ऑगस्ट रोजी पाळले जाईल.
श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला शिववास योग तयार होत आहे. या योगामध्ये भगवान शिवाचा अभिषेक केल्याने भक्तावर शिव-शक्तीचे आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्याचसोबत जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असतील किंवा तुम्हाला ग्रहांचा त्रास जाणवत असेल तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करताना शिवलिंगावर लवंग आणि बडीशेप या दोन गोष्टी अर्पण करा. असे केल्यास सर्व ग्रहदोष दूर होतात आणि येणारे संकटही दूर होतात. तसेच जीवनात सुख-समृद्धी वाढेल.
जो व्यक्ती प्रदोष व्रताच्या दिवशी खऱ्या मनाने भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतो त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते. यासोबतच व्यक्तीला धन-संपत्ती तसेच संततीचे सुख देखील मिळते. मान्यतेनुसार, भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी दर महिन्याला प्रदोष व्रत केले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)