फोटो सौजन्य- pinterest
रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणींच्या अतूट प्रेमाचा सण आहे. बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यावेळी भाऊ देखील त्यांच्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. यंदा हा सण शनिवार, 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. राखी बांधताना या धाग्याच्या साहित्याला देखील विशेष महत्त्व आहे. भावाला कोणत्या प्रकारची राखी बांधणे असते फायदेशीर, जाणून घ्या
श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात शुक्रवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता सुरु होणार आहे. या तिथीची समाप्ती शनिवार 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.24 वाजता होईल. अशावेळी रक्षाबंधनाचा सण शनिवार 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.
असे म्हटले जाते की, रक्षाबंधनासाठी सर्वात पारंपरिक आणि सामान्य धागा म्हणजे रेशीम किंवा कापूस यांच्या धाग्याच्या राखीला अत्यंत शुभ मानले जाते. कारण याला पवित्रता, कोमलता आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. रेशमी राख्या या मऊ असतात त्यामुळे नात्यातील नाजूकपणा आणि ताकद दोन्ही दर्शवतात. तर कापूस किंवा रेशमी धाग्याती राखी घातल्याने भावाकडून संरक्षणाचा आशीर्वाद मिळतो, असे म्हटले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, चांदीचा संबंध चंद्राशी असल्याचे मानले जाते. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र दोष असतो त्यांच्या बहिणींनी चांदीची राखी बांधल्यास या दोषापासून त्यांची सुटका होऊ शकते. यामुळे चांदीची राखी बांधणे शुभ मानले जाते. चांदीला शीतलता आणि मानसिक शांतीचे प्रतीक मानले जाते. हे भावाला मानसिकदृष्ट्या सांत्वन देते.
मान्यतेनुसार, सोन्याला संपत्ती, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. यावेळी बहिणी भावाला सोन्याच्या राख्या बांधतात. सोन्याची राखी फक्त बहिणीला तिच्या भावाबद्दल असलेले प्रेम दर्शवत नाही तर त्याच्या प्रगती आणि समृद्धी देखील दर्शवते. म्हणूनच शास्त्रांमध्ये सोन्याची राखी बांधणे शुभ मानले जाते.
राखीची खरी शक्ती त्याच्या धाग्यातून किंवा धातूतून येत नाही, तर ती ज्या भावनेने बांधली जाते त्यातून येते. ती राखी रेशमी असो, चांदी असो किंवा सोन्याची ती खऱ्या मनाने बांधली गेली असेल आणि भावाप्रती प्रेम आणि संरक्षणाची भावना असेल तर ती राखी सर्वात शुभ आणि फलदायी असते. प्रत्येक बहीण तिच्या क्षमतेनुसार तिच्या भावासाठी राखी निवडते आणि ही भावना या सणाचे सर्वात मोठे सौंदर्य असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)