फोटो सौजन्य- pinterest
प्रदोष व्रताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. हे व्रत प्रत्येक महिन्याला दोन वेळा पाळले जाते. पहिले व्रत शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला आणि दुसरे कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाते. प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. या व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिव आणि देवी पार्वतीची पूजा करावी. मान्यतेनुसार, यावेळी पूजा केल्याने भक्ताच्या जीवनात आनंद येतो आणि सर्व अडचणी दूर होतात. त्याचप्रमाणे काही उपाय केल्याने या दिवशी अनेक समस्यांपासून सुटका होते, असे देखील मानले जाते.
यावेळी श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत बुधवार, 6 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी शिववास योग देखील तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी देवाचे आशीर्वाद घेणे फायदेशीर ठरते. जर एखाद्या दिवशी तुम्हाला सोमवारी देवाची पूजा करता आली नसेल तर श्रावणातील प्रदोष व्रताच्या दिवशी देवाला त्याचे आवडते फूल अर्पण करावे. त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
महादेवांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी श्रावण महिन्यातील प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना कनेराचे फूल अर्पण करावे. हे फूल महादेवांना अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. या फुलांचा रंग पांढरा आणि लाल असणे खूप शुभ मानले जाते.
महादेवांना अनेक फूले आवडतात. त्यापैकी एक म्हणजे शमीचे फूल. कारण महादेवांना शमीचे फूल सर्वांत जास्त आवडते. या फुलांचा वेद आणि पुराणामध्ये देखील उल्लेख केलेला आहे. श्रावण महिन्यातील प्रदोष व्रताच्या दिवशी शमीचे फूल अर्पण केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
श्रावण महिन्यातील प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना आकचे फूल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात. महादेवांना हे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. या महिन्यामध्ये ही शिवलिंगावर ही फुले अर्पण केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि रखडलेली कामे देखील पूर्ण होतात.
श्रावण महिन्यातील प्रदोष व्रताच्या दिवशी धतुराचे फूल अर्पण केले जाते. हे फूल अर्पण करणे खूप प्रिय मानले जाते. यावेळी शिवलिंगावर फुलांसोबत धतुराचे फळ देखील अर्पण करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, हे फूल अर्पण केल्याने व्यक्तीचे पाप धुऊन जातात आणि त्याला पुण्य प्राप्त होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)