
फोटो सौजन्य- pinterest
माघ महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत हा जानेवारी महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत असणार आहे. तो माघ महिन्याच्या शुभ पंधरवड्याच्या तेराव्या दिवशी पाळला जाणार आहे. या दिवशी शुक्रवार असल्याने त्याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योगही तयार होणार आहे. जे लोक प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास करतात, महादेवांची पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. यावेळी प्रदोष व्रत कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया
पंचांगानुसार, या वर्षी माघ महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रताची सुरुवात शुक्रवार, 30 जानेवारी रोजी सकाळी 11.9 वाजता होणार आहे आणि याची समाप्ती रविवार, 31 जानेवारी रोजी सकाळी 8.25 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार यावेळी प्रदोष व्रत शुक्रवार, 30 जानेवारी रोजी पाळले जाणार आहे.
जानेवारीमध्ये शुक्ल प्रदोष व्रताची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 5.59 वाजता सुरू होणार आहे आणि रात्री 8.37 पर्यंत असेल. या दिवशी महादेवाची पूजा करण्यासाठी भाविकांना 2 तास 38 मिनिटे शुभ मुहूर्त मिळेणार आहे. या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 5.25 ते 6.18 पर्यंत असणार आहे. तर त्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त दुपारी 12.13 ते 12.56 पर्यंत असेल. त्या दिवसाचा निशिता मुहूर्त 31 जानेवारी रोजी पहाटे 12.8 ते 1.1 पर्यंत आहे.
जानेवारी महिन्याच्या शेवटचे प्रदोष व्रत शनिवार, 31 जानेवारी रोजी पहाटे 3.27 ते सकाळी 7.10 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग तयार होईल. या वेळी रवि योग देखील उपस्थित असेल. शुक्र प्रदोष रोजी पहाटेपासून दुपारी 4.58 पर्यंत वैधृती योग राहील, त्यानंतर विष्कंभ योग तयार होईल. माघ शुक्ल त्रयोदशीला, अर्द्रा नक्षत्र 31 जानेवारी रोजी पहाटे 3:27 पर्यंत राहील, त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र राहील.
30 जानेवारी रोजी राहुकाळ सकाळी 11.13 वाजता सुरू होणार आहे आणि दुपारी 12.35 पर्यंत राहील. राहुकाळादरम्यान, तुम्ही कालसर्प दोष काढून टाकण्यासाठी पूजा करू शकता.
प्रदोष व्रताच्या दिवशी दूध, दही आणि तांदूळ दान केल्याने मनाला शांती मिळते. असे मानले जाते की पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने चंद्र मजबूत होतो आणि तणाव कमी होतो. याशिवाय, गरजूंना अन्न, कपडे आणि पैसे दान केल्याने सुख, समृद्धी आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: माघ महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत 30 जानेवारी रोजी आहे
Ans: पापांचे क्षालन होते मनोकामना पूर्ण होतात आरोग्य, धन आणि सुख-समृद्धी प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे.
Ans: नोकरी, व्यवसायात अडचणी असलेले, आरोग्य समस्या असलेले, विवाह किंवा संततीसंबंधी अडथळे असलेले भक्त हे व्रत करू शकतात.