फोटो सौजन्य- pinterest
बऱ्याचदा लोकांच्या हातामध्ये कासवाच्या अंगठ्या असलेल्या दिसतात. काही जणांसाठी ती घालणे म्हणजे फॅशन आहे असे वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का की कासवाची अंगठी घालल्याने तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येते? ज्योतिषशास्त्रानुसार, कासवाची अंगठी खूप शुभ मानली जाते. ही अंगठी भगवान विष्णूच्या कासवाच्या अवताराचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते.
असे मानले जाते की कासवाची अंगठी घातल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनातील समस्या कमी होतात. दरम्यान, कासवाची अंगठी घालण्याचे काही नियम सांगण्यात आलेले आहे. जर या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या येऊ शकतात. रत्नशास्त्रानुसार कासवाची अंगठी काही राशीच्या लोकांनी घालणे अशुभ मानले जाते. कोणत्या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालू नये जाणून घ्या
कासवाची अंगठी घालण्याचे महत्त्वपूर्ण फायदे असले तरी, सर्व राशींनी ती घालण्याचे फायद्याचे असल्याचे मानले जात नाही. रत्नशास्त्रानुसार, मेष, कन्या, वृश्चिक आणि मीन राशींच्या लोकांनी कासवाची अंगठी घालणे टाळावे. ज्योतिषशास्त्रानुसार या चारही राशी जल तत्वाच्या आहेत. म्हणूनच, कासवाची अंगठी घातल्याने या राशीच्या लोकांमधील शीतलता आणखी वाढू शकते.
यामुळे या राशींच्या लोकांमध्ये अधिक रागीटपणा येऊ शकतो. शिवाय, कासवाची अंगठी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर देखील परिणाम करू शकते, म्हणून या राशींच्या लोकांनी कासवाची अंगठी घालणे टाळावे.
रत्नशास्त्रानुसार, वृषभ आणि मकर राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालणे खूप शुभ मानले जाते. या दोन्ही राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालावी. या दोन्ही राशींसाठी कासवाची अंगठी खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. ही अंगठी परिधान केल्याने आनंद आणि समृद्धी वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि प्रेम जीवन देखील सुधारते.
कासवाची अंगठी घालताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नेहमी चांदीची कासवाची अंगठी घाला. कासवाच्या पाठीवरील “श्री” चिन्ह लक्षात घेतले पाहिजे. अंगठी घालण्यापूर्वी ती गंगाजलने स्वच्छ करून घ्यावी. कासवाचे तोंड नेहमी तुमच्याकडे असले पाहिजे. अंगठीची ही स्थिती अधिक फायदेशीर असल्याचे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कासवाची अंगठी ही सामान्यतः धातू किंवा रत्नावर कोरलेले कासवाचे चिन्ह असलेली अंगठी असते. वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार कासव स्थैर्य, धनवृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
Ans: आर्थिक स्थैर्य मिळते, नोकरी व व्यवसायात प्रगती होते, नकारात्मक ऊर्जा दूर राहते, भाग्याची साथ मिळते अशी मान्यता आहे.
Ans: कासवाची अंगठी मेष, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी घालू नये






