फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. हे व्रत भगवान शिव आणि पार्वती यांना समर्पित आहे. या व्रताचे पालन केल्याने सुख, समृद्धी आणि यश मिळते, असे मानले जाते. प्रत्येक महिन्यात दोनदा प्रदोष व्रत पाळले जाते. यावेळी भगवान शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी विधीनुसार पूजा केल्यास शुभ फळ मिळते. जून महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या
पंचांगानुसार, त्रयोदशी तिथी तिथीची सुरुवात सोमवार, 23 जून रोजी पहाटे 1:21 वाजता सुरू होईल आणि त्या तिथीची समाप्ती 23 जून रोजी रात्री 10:09 वाजता समाप्त होईल. उद्यतिथीनुसार, प्रदोष व्रत 23 जून रोजी पाळले जाणार आहे. सोमवारी येणाऱ्या या व्रताला सोम प्रदोष व्रत म्हटले जाते. पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 7 वाजून 22 मिनिटांपासून ते 9 वाजून 23 मिनिटांपर्यंत असेल. पूजेसाठी एकूण कालावधी 2 तास राहील.
सोमवारी त्रयोदशी तिथीला येणाऱ्या व्रताला सोम प्रदोष व्रत म्हटले जाते. हे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तसेच त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्र अशुभ स्थितीत असते त्या व्यक्तींनी सोम प्रदोष व्रत पाळल्यास त्याचा फायदा होतो. बऱ्याचदा हे व्रत अपत्य प्राप्तीसाठी केले जाते. असे म्हटले जाते की, तुमच्या सर्व अडचणींतून सुटका होईल.
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करा आणि सूर्यदेवाला पाणी अर्पण करा यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. त्यानंतर देव्हारा स्वच्छ करुन भगवान शिवांचा पंचामृताने अभिषेक करा. पूजा झाल्यानंतर भगवान शिवाला बेलपत्र, फुले, धूप, दिवे इत्यादी गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यानंतर प्रदोष व्रताची कथा वाचावी. पूजा आणि दान करुन झाल्यानंतर भगवान शिवाची आरती करुन शिव चालिसाचे पठण करा.
मान्यतेनुसार, प्रदोष व्रताच्या भगवान शिवाची पूजा केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि वैवाहिक जीवनात गोडवा आणि सुसंवाद वाढतो. हे व्रत केल्याने मानसिक शांती देखील मिळते, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)