फोटो सौजन्य- pinterest
सनातन हिंदू धर्मामध्ये मासिक कालाष्टमी व्रताला खूप महत्त्व आहे. या व्रताच्या दिवशी कालभैरवाची पूजा केली जाते. तसेच स्नान दान करण्यालाही महत्त्व आहे. विशेष म्हणजे या दिवशी कालभैरवाची मनोभावे पूजा केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.
पंचांगानुसार, कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी सुरुवात बुधवार, 18 जून रोजी दुपारी 1.34 वाजता होणार आहे आणि त्याची समाप्ती गुरुवार, 19 जून रोजी रात्री 11.55 वाजता होईल. उद्यतिथीनुसार मासिक कालाष्टमीचे व्रत बुधवार, 18 जून रोजी पाळले जाईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, कालाष्टमीच्या दिवशी रवी योग तयार होत आहे. हा योग रात्री 9.36 पर्यंत असेल. तसेच शिववास योग संध्याकाळी 7.59 पर्यंत राहील. या शुभ योगामध्ये कालभैरवाची पूजा केल्याने भक्ताला दुप्पट लाभ मिळतो, अशी मान्यता आहे. तसेच तुमचे कोणतेही काम दीर्घकाळापासून अडकले असेल तर ते पूर्ण होते अशी मान्यता आहे.
कालाष्टमीच्या दिवशी शिवाच्या भयंकर रुप म्हणजे कालभैरवाची पूजा केली जाते. यांची पूजा केल्याने भय आणि त्रास दूर होतात. मान्यतेनुसार, भैरव त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना नकारात्मक शक्तींपासून वाचवतात. या दिवशी त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. यामुळे शनि आणि राहूचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी देखील हे व्रत फायदेशीर मानले जाते. हे व्रत सर्वांनी पाळल्यास व्यक्तीच्या जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतात, असे मानले जातात.
कालभैरवाचा संबंध शनिदेवाशी मानला जातो त्यामुळे मोहरीचे तेल कालभैरवाला समर्पित मानले जाते. मोहरीचे तेल दान केल्याने शनिचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते. यामुळे गरीब व्यक्तीला मोहरीचे तेल दान करावे.
शनि आणि राहू-केतूचा संबंध काळे तिळाशी संबंधित आहे. कालभैरवांच्या पूजेमध्ये काळे तिळांना विशेष महत्त्व आहे. ब्राम्हणाला काळे तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी लाडूचे दान करणे देखील शुभ मानले जाते.
काळभैरवाला काळा आणि गडद निळा रंग प्रिय आहे. कालभैरवाला या गोष्टींचे दान केल्याने नकारात्मक शक्तींपासून रक्षण होते, असे म्हटले जाते. तसेच गरिबांना ब्लॅकेट दान करणे शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)