
फोटो सौजन्य- pinterest
पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पौष एकादशी असे म्हटले जाते. यावर्षी पौष पुत्रदा एकादशी 30 डिसेंबर रोजी आहे. या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. या दिवशी केलेला उपवास, पूजा आणि दान हे शुभ मानले जाते. ही एकादशी वर्षातील शेवटची एकादशी असल्याने या एकादशीचे आशीर्वाद देखील मिळतात, असेदेखील म्हटले जाते. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी असे काही करु नये जे येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्यासाठी अशुभ ठरू शकेल. पौष पुत्रदा एकादशीचा उपवास बालसुख, कौटुंबिक समृद्धी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
असे मानले जाते की या दिवशी भक्तीभावाने प्रार्थना केल्याने आणि विहित विधींचे पालन केल्याने मुलांशी संबंधित समस्या दूर होतात. शिवाय, या दिवशी दान करणेदेखील पुण्यपूर्ण मानले जाते. मात्र शास्त्रांमध्ये या तिथीला काही वस्तूंचे दान करणे निषिद्ध मानले जाते. कारण पुण्य ऐवजी त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात. एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करु नये जाणून घ्या
पंचांगानुसार, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात 30 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता सुरू होणार आहे. या एकादशी तिथीची समाप्ती 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता होणार आहे. अशा वेळी हे व्रत 30 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे. वैष्णव परंपरेचे पालन करणारे लोक 31 डिसेंबर रोजी हे व्रत पाळणार आहे.
शास्त्रांनुसार, पुत्रदा एकादशीला लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करण्यास मनाई आहे. तसेच, या दिवशी काळे तीळ किंवा काळे कपडे दान करणे टाळा. या गोष्टींचा संबंध शनि आणि नकारात्मक प्रभावांशी संबंधित आहेत, ज्यामुळे जीवनात अडथळे वाढू शकतात.
पौष पुत्रदा एकादशीला तेलाचे दान करण्याचे टाळावे. असे मानले जाते की, यामुळे संततीच्या आनंदात अडथळे येऊ शकतात आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात.
पौष पुत्रदा एकादशीला कोणालाही मीठ दान करू नका किंवा उधार देऊ नका. यामुळे पुण्यपेक्षा पाप होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित एक अत्यंत पुण्यदायी एकादशी मानली जाते. या दिवशी व्रत, पूजा आणि योग्य दान केल्यास संतानसुख, सुख-समृद्धी आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते.
Ans: या वस्तू शनी, राहू किंवा नकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानल्या जातात. एकादशीसारख्या पवित्र दिवशी त्यांचे दान केल्यास व्रताचे फळ कमी होऊ शकते आणि जीवनात अडचणी येऊ शकतात.
Ans: या एकादशीचा प्रभाव संतानसुख, कुटुंबातील शांतता, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगतीवर पडतो.