फोटो सौजन्य- pinterest
दरम्यान जर वास्तुच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे अशुभ परिणाम जाणवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार अशा दोन गोष्टी आहेत त्या कधीही एकत्र स्वयंपाकघरामध्ये ठेवू नये. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि हळद हे दोन्ही स्वयंपाकघरातील आवश्यक पदार्थ आहेत, परंतु त्यांचे परिणाम वेगवेगळे आहेत. मीठ चव आणि उर्जेशी संबंधित आहे, तर हळद शुभतेचे प्रतीक मानली जाते आणि ती पूजेशी देखील संबंधित आहे. मीठ आणि हळद एकत्र ठेवल्याने त्यांच्या उर्जेमध्ये संघर्ष होऊ शकतो, ज्याचा परिणाम घरातील वातावरणात होताना दिसून येतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, मीठ चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. मीठ मनावर आणि भावनांवर परिणाम करते. जर स्वयंपाकघरात मीठ योग्यरित्या साठवले नाही तर ते चिडचिडेपणाचे कारण बनू शकते. त्यामुळे मीठ हे नेहमी स्वयंपाकघरामध्ये स्वच्छ भांड्यामध्ये ठेवावे. त्यासोबतच हळद हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. धार्मिक कार्यामध्ये याचा नेहमी वापर केला जातो. त्याचा संबंध गणपतीशीदेखील असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्याचा वापर व्यवस्थितरित्या करणे महत्त्वाचे मानले जाते.
श्रद्धेनुसार स्वयंपाकघरात एकाच भांड्यात किंवा जागी हळद आणि मीठ ठेवल्याने घरात संघर्ष आणि तणाव वाढू शकतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये अस्वस्थता, कामावरून लक्ष विचलित होणे आणि निर्णय घेण्यातील गोंधळ निर्माण होऊ शकतो.
हळद ही शुभतेचे, समृद्धीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. तर मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे तत्त्व मानले जाते. ज्यावेळी घरामध्ये या दोन्ही विरुद्ध ऊर्जेच्या वस्तू एकत्र ठेवल्या जातात, त्यावेळी घरामध्ये ऊर्जेचा असमतोल निर्माण होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: वास्तुशास्त्रानुसार हळद आणि मीठ या दोन गोष्टी किचनमध्ये एकत्र ठेवू नयेत. या दोन्हींची ऊर्जा वेगवेगळी असल्यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते.
Ans: घरात वारंवार वादविवाद, कुटुंबीयांमध्ये गैरसमज, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी
Ans: हळद नेहमी स्वच्छ, बंद डब्यात ठेवावी , मीठ वेगळ्या डब्यात व झाकण लावून ठेवावे , दोन्ही डबे एकमेकांपासून थोड्या अंतरावर ठेवावेत






