
फोटो सौजन्य- pinterest
मंगळवार, 6 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच विशेष नाही तर त्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व देखील आहे. पंचांगानुसार, मंगळवार, 6 जानेवारी रोजी ग्रहांचा राजा सूर्य आणि प्रेम आणि आनंद देणारा ‘शुक्र’ एकमेकांपासून ०° वर स्थित असतील आणि युती दृष्टी योग तयार करतील. ज्योतिषशास्त्रानुसार युती दृष्टी योग शुभ मानला जातो. या काळात संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासून या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येतील. संकष्टी चतुर्थीचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे जाणून घ्या
युती दृष्टी योग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. संकष्टी चतुर्थीला तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. शिवाय, तुम्हाला आर्थिक अडचणींपासून तात्पुरती आराम मिळेल. मात्र यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी. जुने आजार हळूहळू बरे होतील. जे लोक कोणत्याही परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी अभ्यासावर लक्ष केद्रिंत करावे. परीक्षेत चांगले गुण मिळतील. सामाजिक क्षेत्रात मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.
तूळ राशीच्या लोकांना संकष्टी चतुर्थीचा चांगला राहणार आहे. यावेळी तुम्हाला कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने काम करावे लागेल आणि महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. ज्याचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्ही तुमचे नुकसान लवकरच भरून काढू शकाल. भागीदारीमध्ये असणाऱ्या चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.
वृषभ आणि तूळ राशींव्यतिरिक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा योग मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. मित्रांच्या मदतीने, नोकरी करणारे लोक नवीन ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. तुम्हाला पैसे कमविण्याच्या उत्तम संधी देखील मिळतील. तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला त्याची चिंता राहणार नाही. जोडीदारासोबत आणि मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल. यावेळी तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा योग फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत एकत्र येतात (युती) आणि इतर ग्रहांची अनुकूल दृष्टी त्यांच्यावर पडते, तेव्हा युती-दृष्टी योग तयार होतो. हा योग शुभ फल देणारा मानला जातो.
Ans: गणेश पूजेच्या दिवशी ग्रहांचा असा शुभ संयोग होणे अत्यंत फलदायी मानले जाते. यामुळे अडथळे दूर होऊन यशाची दारे उघडतात.
Ans: या युती-दृष्टी योगाचा लाभ विशेषतः वृषभ, कर्क, कन्या, तुला आणि मकर राशीच्या लोकांना होण्याची शक्यता आहे.