फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव कर्मदाता आणि न्यायाधीश मानले जातात. शनि वेळोवेळी उगवतो आणि मावळतो आणि त्याचा प्रभाव केवळ व्यक्तीच्या जीवनावरच नाही तर संपूर्ण देश आणि जगाच्या परिस्थितीवरही जाणवतो. विशेषतः शनिचा उदय जीवनात महत्त्वपूर्ण बदल आणि संधी घेऊन येतो. त्याच्या उदयामुळे व्यक्तीच्या कृती आणि प्रयत्नांवर आधारित परिणाम मिळतात, ज्यामुळे ज्योतिषशास्त्रात ते अत्यंत महत्त्वाचे ठरते.
एप्रिलमध्ये शनिदेव मीन राशीमध्ये उद्याला येणार आहेत. यावेळी काही राशींचे नशीब बदलण्याची शक्यता आहे. शनिच्या उदयामुळे नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याचीदेखील शक्यता आहे. करिअर आणि आर्थिक परिस्थितीसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. शनिच्या उदयाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिचा उदय उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत शुभ राहील. कारण शनि तुमच्या राशीपासून अकराव्या घरात असल्याने या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकते. नवीन प्रकल्पांमुळे तुमच्या यशाची आणि आर्थिक लाभाची शक्यता वाढेल. तुमचे धाडस आणि संतुलित निर्णय तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देतील. तसेच गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमधूनही फायदा होऊ शकतो. कौटुंबिक स्थिती चांगली राहील.
शनिदेवाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. कारण तो तुमच्या कुंडलीमध्ये दहाव्या घरात असणार आहे. तो तुमच्या राशीच्या आठव्या आणि नवव्या घरात देखील राज्य करतो. या काळात तुमची तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक केले जाईल. नात्यांमध्ये सुसंवाद राहील आणि तुमचे निर्णय बुद्धिमत्ता आणि शहाणपणाने परिपूर्ण असतील. या काळात नवीन गुंतवणूक किंवा व्यवसायाच्या संधी फायदेशीर ठरतील. संशोधनात सहभागी असलेल्यांना फायदा होऊ शकतो.
शनिचा उदय मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या राशीपासून तिसऱ्या घरात शनि उदयास येत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. या काळात तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळत मिळतील. नवीन प्रकल्प आणि योजना देखील यशस्वी होऊ शकतात. शिवाय, या काळात संपत्ती, आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शनी ग्रह सूर्याच्या जवळ असल्यामुळे काही काळ अस्त होतो. त्यानंतर जेव्हा शनी पुन्हा आकाशात स्पष्टपणे दिसू लागतो, त्या स्थितीला शनी उदय असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात याला महत्त्वपूर्ण बदलाचा काळ मानले जाते.
Ans: 30 वर्षांनंतर होणारा शनी उदय दुर्मिळ मानला जातो. या काळात कर्म, न्याय, शिस्त आणि मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता अधिक वाढते.
Ans: आळस, अप्रामाणिकपणा, नियमभंग आणि वडीलधाऱ्यांचा अपमान टाळावा. शनी कर्माचा कारक असल्याने चुकीच्या कृत्यांचे परिणाम तीव्र होऊ शकतात.






