फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. प्रत्येक महिन्याच्या तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. जून महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. गणपतीची पूजा करण्यासाठी आजचा दिवस खूप खास मानला जातो. पंचांगानुसार, शनिवार 14 जून रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी चंद्रोद्य रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी असणार आहे.
संकष्टी चतुर्थी तिथीची सुरुवात आज शनिवार, 14 जून रोजी दुपारी 3 वाजून 46 मिनिटांनी सुरु होईल या तिथीची समाप्ती रविवार, 15 जून रोजी दुपारी 3 वाजून 51 मिनिटांनी होईल. उद्यतिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे हे व्रत शनिवार, 14 जून रोजी पाळले जाणार आहे.
मेष राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल चंदन अर्पण करावे. तसेच ओम गजानयनाय नम: या मंत्रांचा जप करावा.
वृषभ राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश चालिसाचे पठण करावे त्यासोबतच ॐ गणेशाय नमः या मंत्रांचा जप करावा.
मिथुन राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाची पूजा करुन झाल्यावर बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ॐ द्वैमातुराय नमः या मंत्रांचा जप करावा.
कर्क राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपत्ती बाप्पाला दुर्वा अर्पण करा. ॐ प्रमुखाय नमः या मंत्रांचा देखील जप करा
सिंह राशीच्या लोकांनी पंचामृताचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम विष्णुप्राय नमः या मंत्रांचा जप करावा.
कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या वस्तूंचे दान करावे. पूजा करताना गणपती बाप्पाला पिवळे चंदन लावावे. ओम सुखनिधये नमः या मंत्रांचा जप करावा
तूळ राशीच्या लोकांनी पूजा करतेवेळी गणपती बाप्पाला पिवळे चंदन लावावे. त्यासोबतच ‘ॐ महावीराय नमः या मंत्रांचा जप करावा.
वृश्चिक राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला’ दही किंवा दुधाने अभिषेक करावा. तसेच ओम प्रमाध्याय नम: या मंत्रांचा जप करावा.
धनु राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला पिवळी फुले किंवा वस्त्र अर्पण करावे. तसेच ओम भवात्मजय नम: या मंत्रांचा जप करावा.
मकर राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्तीच्या दिवशी गणेश चालिसाचा पाठ करावा आणि ओम पार्वतीनंदनाय नमः या मंत्रांचा जप करावा
कुंभ राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा. तसेच ओम मोदकप्रियाय नमः या मंत्रांचा जप करावा.
मीन राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीला पूजा झाल्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ मंगलप्रदय नम: या मंत्रांचा जप करावा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)