Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankshthi chturthi: संकष्टी चतुर्थीला गणपतीला पंचामृताने अभिषेक करा; अन्नदान आणि लाडू दानाचे जाणून घ्या महत्त्व

हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीच्या व्रताला खूप महत्त्व आहे. या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपवास करतात आणि रात्री चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडतात. संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय करावे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 02, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • संकष्टी चतुर्थी कधी आहे
  • संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पासोबत शिव पार्वतीची पूजा का केली जाते
  • संकष्टी चतुर्थीला गणपतीला पंचामृताने अभिषेक करा
 

 

हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थी हे भगवान श्रीगणेशाला समर्पित अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते. हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीच्या व्रताला खूप महत्त्व आहे. ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत रविवार, २ ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. असे मानले जाते की या दिवशी व्रत पाळल्याने भगवान शिव आणि गणेशाचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील समस्या दूर होण्यास मदत मिळते.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिपूर्वक पूजा अर्चना करावी. नकळतपणे झालेल्या चुकीचे नकारात्मक परिणाम दूर होण्यास मदत होते. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते. यामुळे याची श्रद्धेने पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात. या दिवशी भगवान शिव आणि गणपतीला पंचामृताने अभिषेक करावा. संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय करावे ते जाणून घ्या

हे व्रत संकटांपासून सुटका करते

आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी गजानन स्वरूपाची पूजा केली जाते. संकष्टी शब्द संस्कृत भाषेतील शब्द आहे. ज्याचा अर्थ संकटांतून सुटका होणे असा होतो. हेच कारण आहे की भगवान शिवाची पूजा केल्याने संकटांतून सुटका होते आणि समय दूर होतात. गणेश पुराणात चतुर्थीला गणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते.

Sankashti Chaturthi: ऑगस्टमध्ये संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ

गणेशासोबत करा शिव पार्वतीची पूजा

श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा संबंध भगवान शिव यांच्याशी संबंधित आहे. भगवान गणेशाला शिव आणि पार्वती यांचा पुत्र मानला जातो. त्यामुळे गणेशासोबत शिव आणि पार्वतीची देखील पूजा केली जाते. शिव आणि पार्वती यांच्या पूजेमध्ये फुल, बेलपत्र अर्पण केले जाते. देवी पार्वतीला सौभाग्याचे अलंकार, जसे की बांगड्या, टिकली, कुंकू अर्पण करावे. भगवान गणेशाला पंचामृताने अंघोळ घालावी त्यांनंतर पाण्याने अंघोळ घालावी. वस्त्र आणि हार फुलांनी सजवावे. धूप दिवा लावावा. दुर्वा आणि लाडू अर्पण करावे. ओम गं गणपतये नमः या मंत्रांचा जप करावा.

या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात. संध्याकाळच्या वेळी गणेशाची पूजा करून आणि चंद्राला नेवैद्य दाखवून उपवास सोडला जातो. गणपतीला लाडू मोदकाचा नेवेद्य दाखवला जातो. या दिवशी गरजूवंतांना लाडू, कपडे, अन्न आणि चप्पल दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी श्रद्धेने पूजा आणि दान केल्यास जीवनात सुख शांती येते आणि समस्या दूर होण्यास मदत होते.

Dev Prasad Rules: देवाचा प्रसाद नेहमी उजव्या हातानेच का घेतला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम

संकष्टीला याप्रकारे करू शकता पूजा

संकष्टीचे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावी. काही जण या दिवशी काळया तिळाने आंघोळ करतात. यानंतर गणपतीची प्रार्थना करावी.

घरामध्ये भगवान गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून त्याची पूजा करावी. मूर्ती सोने, चांदी, तांबे किंवा मातीची असायला हवी.

त्यानंतर भगवान गणेशाला पाणी आणि पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर नवीन वस्त्र अर्पण करावे. पूजेच्या वेळी चंदन, तांदूळ, फूल, धूप आणि दिवा अर्पण करावा. गणपती बाप्पाला मोदक लाडूचा नेवेद्य दाखवून नारळ अर्पण करावा. नंतर संकष्टी चतुर्थीची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करावी.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: संकष्टी चतुर्थीला पंचामृताने अभिषेक का करावा?

    Ans: पंचामृताने अभिषेक केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि सुख, समृद्धी तसेच विघ्नांचे निवारण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • Que: संकष्टी चतुर्थीला गणपतीला कोणता नैवेद्य अर्पण करावा?

    Ans: गणपतीला मोदक, लाडू, दूर्वा, लाल फुले आणि फळांचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते.

  • Que: संकष्टी चतुर्थीला अन्नदान आणि लाडू दानाचे महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवशी अन्नदान आणि लाडू दान केल्याने पुण्यप्राप्ती होते तसेच गरजूंचे आशीर्वाद मिळतात, अशी श्रद्धा आहे.

Web Title: Sankshthi chturthi upay this solution will help you get out of trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 07:05 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.