
फोटो सौजन्य- pinterest
दर महिन्यामध्ये दोन एकादशीचे व्रत पाळले जाते आणि वर्षभरात 24 एकादशीचे व्रत असतात. हे व्रत विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहेत. या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. पौष महिन्यात सफला एकादशीचे व्रत केले जाते. दरवर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला हे व्रत पाळले जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व कार्यांमध्ये यश मिळते. या उपवासाच्या परिणामामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळते आणि एखाद्याच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात. शास्त्रांनुसार, सफला एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांना हजारो वर्षांच्या तपश्चर्येइतके फळ मिळते. शिवाय, ते पाळल्याने घरात सौभाग्य आणि समृद्धी येते. कधी आहे सफला एकादशी आणि पूजेसाठी काय आहे मुहूर्त जाणून घ्या
लवकरच पौष महिन्याची सुरुवात होणार आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफलता एकादशी असे म्हणतात. सफलता एकादशीचे व्रत केल्याने पापांचे क्षालन होते आणि पुण्य प्राप्त होते. हा उपवास दोन प्रकारे करता येतो. निर्जल किंवा फळरहित. तुम्ही दोन्ही प्रकारे उपवास करू शकता. या दिवशी भगवान विष्णूला पिवळी फुले, तुळस आणि फळे अर्पण करावीत.
पंचांगानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात रविवार, 14 डिसेंबर रोजी रात्री 8.46 वाजता होणार आहे आणि सोमवार, 15 डिसेंबर रोजी रात्री 10.9 वाजता या तिथीची समाप्ती होणार आहे. अशा वेळी सोमवार, 15 डिसेंबर रोजी सफला एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त पहाटेपासून ते सकाळी 11.08 वाजेपर्यंत असेल.
एकादशीच्या उपवासाच्या एक दिवस आधी दशमी तिथीच्या संध्याकाळी सात्विक जेवण करा.
एकादशीच्या सकाळी स्नान करा आणि हातात पाणी घेऊन उपवास करण्याचे व्रत घ्या.
त्यानंतर भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा.
त्यांना पिवळे कपडे, पिवळी फुले आणि तुळशीची पाने अर्पण करा.
विष्णू सहस्रनामाचे पठण करा.
केळी, मिठाई आणि पंचामृत अर्पण करा.
एकादशीला भात खाण्यास सक्त मनाई आहे.
या दिवशी गरजूंना अन्न, कपडे आणि पैसे दान करा.
दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला, ब्राह्मणांना जेवण देऊन आणि शुभ मुहूर्तावर दान देऊन उपवास सोडा.
सफला एकादशीचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. हे व्रत केल्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळते आणि कामातील सर्व अडथळे दूर होतात. शास्त्रांनुसार, सफलता एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला त्यांच्या हजारों वर्षांच्या तपश्चर्येइतके फळ मिळते. शिवाय हे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते असे देखील म्हटले जाते.
विष्णु सहस्रनाम, भगवद्गीतेचे पठण आणि “ओम नमो भगवते वासुदेवाय” मंत्राचा जप केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. सफला एकादशीच्या रात्री दिव्याचे दान करावे. यामुळे जीवनातील अंधार दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: सफला एकादशी सोमवार 15 डिसेंबर रोजी आहे. हे व्रत भगवान विष्णू यांना समर्पित आहे
Ans: सफलता एकादशीच्या दिवशी यश, सफलता, समृद्धी, कौटुबिक सुख, मिळते
Ans: आर्थिक सृमद्धी, करिअरमध्ये यश , घरात सुख शांती, मानसिक स्थिरता, आध्यात्मिक उन्नती हे लाभ होतात