फोटो सौजन्य- pinterest
आज शुक्रवार 26 सप्टेंबरचा दिवस खास असणार आहे. आज आश्विन कृष्ण चतुर्थी त्यानंतर पंचमी तिथी आहे. आज देवी लक्ष्मी आणि कुष्मांडाची पूजा केली जाणार आहे. चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत संक्रमण करेल. चंद्र मंगळ योगासह अधि योग तयार करेल. विशाखा नक्षत्राच्या शुभ संयोगामुळे रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होईल. कुष्मांडा देवीच्या आशीर्वादाने आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे आज मिथुन, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जास्त फायदेशीर राहणार आहे.
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही आज एखादा मोठा निर्णय घेऊ शकता ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. करिअरच्या बाबतीत तुमचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला आज काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला जोडीदाराकडून अपेक्षित पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्ही कामासाठी प्रवास करू शकता. मित्र किंवा नातेवाईकाकडून मिळालेली मदत तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. परदेशात काम करणाऱ्यांना फायदेशीर करार मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. तुम्ही धार्मिक ठिकाणाला भेट देऊ शकता. वैवाहिक जीवन चांगले राहील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा मिळेल. वाहनाची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्ही नवीन प्रकल्पात पैसे गुंतवल्यास तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. व्यवसायात नफा होईल. तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत मिळेल. तुम्ही आज एखाद्या वस्तूची खरेदी करु शकता.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायातील उत्पन्न चांगले होईल आणि चैनीच्या वस्तूंवरही पैसे खर्च करु शकता. तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रलंबित प्रश्न सोडवले जाऊ शकतात. बँकिंगशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल. वाहन खरेदी करु शकतात.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. समाजामध्ये तुमचा प्रभाव वाढेल. तुम्ही खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील त्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात असणारे लोक चांगली कामगिरी करतील. अनुभवी आणि वयस्कर व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्हाला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)