फोटो सौजन्य- pinterest
3 ऑक्टोबर रोजी शनि देव आपले नक्षत्र परिवर्तन करणार आहे. यावेळी ते पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनिचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या लोकांच्या समस्या वाढवू शकतात तर काहीचे नशीब चमकू शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायदेवता शनि देव शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. यावेळी ते पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पूर्वाभाद्रपद नक्षत्राचे स्वामी ग्रह गुरु आहे जे विवाह, मुले, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अशा वेळी शनिचे गुरुच्या नक्षत्रात प्रवेश करणे काही राशीच्या लोकांसाठी प्रगती, सौभाग्य आणि सकारात्मक उर्जेसह चांगले परिणाम मिळतील. या परिवर्तनामुळे काही राशीच्या लोकांची करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल आणि वैवाहिक जीवनात देखील सुधारणा होईल. शनिच्या नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
शनिचे नक्षत्र परिवर्तनाच्या काळात या लोकांना व्यवसायात नफा होईल. नवीन योजनांमुळे भरीव नफा होईल. या काळात तुम्ही वाहन, जमीन किंवा इतर वस्तूंची खरेदी करु शकता. दरम्यान, तुम्हाला नवीन गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित सौदे देखील मिळू शकतात. जर नात्यात मतभेद असतील तर ते संपतील. आरोग्यात सुधारणा होताना दिसून येईल आणि तुम्ही तुमचा दिवस उत्साहात घालवाल.
या काळात शनिची तुमच्यावर कृपा राहील त्यामुळे तुमचे अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल आणि धार्मिक कार्यासाठी विशेष राहील. परीक्षेतील यश तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देण्यास मदत करेल. तुमचे कठोर परिश्रम आणि प्रयत्न तुमची ओळख बनतील आणि समाजात तुमचा आदर वाढविण्यास मदत करतील. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. भौतिक सुखसोयी आणि सुविधा वाढतील आणि समाजात आदरही वाढेल.
शनिचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. व्यापार किंवा करिअरमध्ये कोणतेही घेतलेल्या निर्णयांमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. यावेळी लग्नामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि जी काम आधी अपूर्ण राहिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. नात्यामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)