फोटो सौजन्य- pinterest
दसरा हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे आणि तो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी फक्त रावणाचे दहन केले जात नसून यावेळी काही उपाय देखील केले जातात. असे मानले जाते की, दसऱ्याच्या दिवशी केलेल्या उपायाने घरामध्ये आनंद आणि समृद्धी येते. विशेषतः यावेळी लिंबूचा वापर केल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते तर संपत्तीमध्ये वाढ होते. दसऱ्याच्या दिवशी घरामध्ये आनंद, शांती आणि संपत्ती आणायची असल्यास असे काही उपाय करणे गरजेचे आहे. दसऱ्याच्या दिवशी लिंबूचे कोणते उपाय करायचे, जाणून घ्या
दसऱ्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिंबू आणि हिरव्या मिरच्यांचा हार लावण्याची जुनी परंपरा असल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की, यामुळे घरात वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. हा उपाय करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून लिंबू आणि मिरचीचा हार तयार करा आणि तो तुमच्या मुख्य दरवाजावर लटकवा. या उपायामुळे केवळ नकारात्मकता दूर होत नाही तर संपत्ती आकर्षित करण्यास देखील मदत होते. दसऱ्याच्या दिवशी हा उपाय केल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते, असे म्हटले जाते.
घरामधील संपत्ती आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी लिंबूचा हा उपाय करणे फायदेशीर ठरतो. लिंबूचा हा उपाय करण्यासाठी सर्वांत प्रथम लिंबू स्वच्छ धुवून घ्या आणि त्याची साले काढून घ्या. ही साल एका भांड्यामध्ये घेऊन त्यावर थोडी हळद आणि तांदळाचे दाणे शिंपडा. ही साल तुमच्या देव्हाऱ्याजवळ नजरेआड ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नदीत बुडवा किंवा घराबाहेरील झाडाखाली ठेवा. असे उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि संपत्ती निर्माण होण्यास मदत होते.
दसऱ्याच्या एक दिवस आधी लिंबाच्या साली उन्हात वाळवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रात्री या सालींपासून दिवा बनवा आणि तो घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा बाल्कनीत मोकळ्या जागेत ठेवा. यामुळे घरातील नकारात्कता दूर होतेच आणि देवी लक्ष्मीचे अस्तित्व देखील राहते.
जर तुम्ही लिंबाच्या सालीपासून दिवा बनवला असाल तर हा उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, म्हणजेच सुख समृद्धी वाढवण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरु शकतो. त्यामुळे घरामधील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)