फोटो सौजन्य- pinterest
दसऱ्यानंतर काही दिवसांनी शरद पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. देशभरात विविध नावांनी संबोधले जाते. जसे की, कोजागरी पौर्णिमा, कौमुदी व्रत, कुमार पौर्णिमा, महारास किंवा रास पौर्णिमा या नावानी देखील ओळखले जाते. हा सण त्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. ज्याचा संबंध भक्ती, समृद्धी आणि निसर्गाच्या आशीर्वादाच्या प्रतीकाशी मानला जातो.
दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी शरद पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा शरद पौर्णिमा सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी तांदळ्याची खीर बनवण्याची प्रथा आहे. ज्याचा संबंध आरोग्य आणि आध्यात्मिक फायद्यांसाठी शुभ मानला जातो.
शरद पौर्णिमेला खीर बनवणे ही एक जुनी परंपरा आहे. ही खीर बनवायला खूप सोपी आहे आणि चविष्ट देखील आहे. खीर बनवण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते जाणून घ्या
अर्धा लिटर दूध, अर्धा कप बासमती तांदूळ, 2-3 केशर, अर्धा कप साखर, एक चतुर्थांश कप किसलेले नारळ आणि काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे (प्रत्येकी एक चतुर्थांश कप), आणि एक चमचा वेलची पावडर.
सर्वप्रथम तांदूळ धुवून सुमारे एक तास भिजवून ठेवा. त्यानंतर दोन चमचे दुधात केशर भिजवा आणि बाजूला ठेवा. त्यानंतर एका पॅनमध्ये दूध गरम करुन घ्या त्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाका आणि मंद आचेवर शिजवा. भात व्यवस्थित शिजल्यावर त्यात साखर, वेलची पूड, नारळ आणि काजू घालून मिक्स करा. थोडा वेळ ढवळून घ्या आणि नंतर गॅस बंद करा. वाढण्यापूर्वी, खीर पिस्ते आणि बदामाच्या कापांनी सजवा.
शरद पौर्णिमेचे महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. पुराणानुसार, या रात्री भगवान श्रीकृष्णाने गोपींसोबत दिव्य रास केला, म्हणूनच याला रास पौर्णिमा असेही म्हणतात. स्कंद पुराणानुसार, या रात्रीच्या चंद्रकिरणांमध्ये अमृत असते आणि जर या वेळी अन्न ठेवले तर ते औषधी गुणधर्मांनी भरलेले असते. त्याचवेळी पद्मपुराणात असे म्हटले आहे की देवी लक्ष्मी या रात्री पृथ्वीवर अवतरली आणि या दिवशी भक्तीने तिचे आवाहन केल्याने समृद्धी आणि आनंद मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)