फोटो सौजन्य- pinterest
ज्ञानाचा ग्रह असलेला गुरु ग्रह 19 ऑक्टोबर रोजी आपली राशी बदलणार आहे. यावेळी तो कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तो 4 डिसेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. गुरु ग्रहाच्या राशीबदलाचा परिणाम कोणत्या लोकांवर होईल.
ज्ञानाचा ग्रह असलेला गुरु ग्रहाने 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.57 वाजता कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि या राशीमध्ये तो 4 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. यानंतर देव गुरु बृहस्पति 4 डिसेंबर रोजी रात्री 8.39 वाजता मिथुन राशीत परत येईल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाची होणारी हालचाल ही एक महत्त्वाची घटना आहे. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. ज्यावेळी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी या राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती, कलात्मक उत्कृष्टता, संततीचा आनंद आणि वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्तता अनुभवता येते. तसेच प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळतात. गुरु ग्रहाच्या राशीबदलाचा परिणाम कोणत्या लोकांवर होईल, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांना या काळात सकारात्मक बदल होतील. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगले परतावे मिळण्याची शक्यता आहे. यावेळी व्यवसायात तुम्हाला सकारात्मक बदल होताना दिसून येईल. तुमच्या कामावरील तुमचा आत्मविश्वास वाढेल. लग्नातील अडथळे दूर होतील आणि तुम्ही एखाद्या खास व्यक्तीशी लग्न करू शकता. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यावेळी चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशीसाठी गुरु ग्रहाचे होणारे बदल या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमच्या कारकिर्दीला सकारात्मक बदल होतील. गुरुच्या प्रभावामुळे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात चांगले यश मिळू शकते. दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच आर्थिक शक्यता होणार आहे. जर तुम्ही तुमचे कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी मिळेल. या काळात तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील. या काळात व्यवसायात तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. गुरु ग्रहाच्या आशीर्वादाने, एखादा मोठा प्रकल्पही यशस्वी होईल. उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडतील. तुमचे वाहन किंवा घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःची बाजू मांडू शकता. तुमच्या मुलाच्या करिअरबद्दलच्या कोणत्याही चिंता दूर होतील. तुमचे आरोग्य सुधारेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)