फोटो सौजन्य- istock
शारदीय नवरात्रीचा उत्सवाची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होईल. नवरात्र हा केवळ उपवास आणि उपासनेचा सण नाही. आत्म्याच्या रंगांना देवी म्हणून पाहण्याची आणि त्यांना आपल्या जीवनात आणण्याची ही वेळ आहे. प्रत्येक दिवस एक देवी, प्रत्येक देवी एक भावना आणि प्रत्येक भावना एक रंग. रंगांच्या उत्सवाच्या नवरात्रीचा हाच खरा आत्मा आहे. नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि कोणते रंगांचे कपडे परिधान करणे शुभ आहे, जाणून घ्या
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. ही देवी पर्वतीय राजा हिमालयाची कन्या आहे आणि स्थिरता, शक्ती आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. या दिवशी पिवळ्या रंगांचे कपडे परिधान केले जाते. हा रंग व्यक्तीच्या जीवनामध्ये उत्साह, ऊर्जा आणि सकारात्मक विचार आणतो.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. या देवीचा संबंध संयम, ध्यान आणि अध्यात्माशी जोडलेला आहे. या दिवशी हिरव्या रंगांचे कपडे परिधान केले जातात. याचा संबंध शांती आणि आत्मसंयमाचे प्रतीक मानला जातो.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या देवीच्या कपाळावर घंटासारखा आकार असलेला चंद्रकोर असतो, त्यामुळे तिला हे नाव मिळाले आहे, असे म्हटले जाते. या दिवशी राखाडी रंगांचे कपडे परिधान करावे. हा रंग संतुलनाचे प्रतीक असल्याचे मानले जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला कृष्मांडाची पूजा केली जाते. या देवीला विश्वाची निर्माता आणि आदिम शक्ती मानली जाते. यावेळी नारंगी रंगांचे कपडे परिधान करावे. याचा संबंध आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि उत्साही जीवनाशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. या देवीमध्ये अढळ प्रेम असल्याचे म्हटले जाते. या दिवशी पांढऱ्या रंगांचे कपडे परिधान केले जाते. हा रंग प्रेम आणि पवित्रतेचे प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग हा शांती, साधेपणा आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या देवीला धैर्य आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी लाल रंगांचे कपडे परिधान करावे. हा रंग शौर्य, प्रेम आणि शक्ती दर्शवितो.
नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमीचा दिवस. या दिवशी कालरात्री देवीचे स्मरण केले जाते. या देवीला भय आणि अंधाराचा नाश करणारे असे म्हटले जाते. या दिवशी निळ्य़ा रंगांचे कपडे परिधान करावे लागेल. या रंगांचा संबंध संरक्षण, खोली आणि आंतरिक शक्ती दर्शवतो.
नवरात्रीच्या आठव्या दिवशी अष्टमीचे व्रत पाळले जाते. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. या देवीला सौम्यता आणि पवित्रतेची देवी मानली जाते. या दिवशी ओम महागौर्य नमः मंत्रांचा जप करावा. या दिवशी गुलाबी रंगांचे कपडे परिधान करावे. गुलाबी रंग कोमलता आणि कृपेचे प्रतिनिधित्व करतो. हा रंग करुणा, प्रेम आणि स्त्रीत्वाचा रंग आहे.
नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे नवमीचा दिवस या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. देवीचे यशाशी नाते आहे, जे केवळ ज्ञानानेच मिळवता येते. या दिवशी जांभळ्या रंगांचे कपडे परिधान करावे. या रंगांचा संबंध अध्यात्म, वैभव आणि ज्ञानाचे प्रतीकाशी संबंधित आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)