फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत चालणारा हा उत्सवाची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे. यावेळी ग्रहण नक्षत्रांच्या स्थितीनुसार नवरात्रीचा काय विशेष मानला जातो. असे मानले जाते की, या काळात देवीच्या नरूपांची पूजा केली जाते, जप केला जातो इत्यादी गोष्टी जे लोक करतात त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये येणारे सर्व संकट दूर होतात.
या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपाची पूजा केल्याने व्यक्तीला मानसिक शांती, आरोग्य, सुख-समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या राशीनुसार विविध उपाय करतो आणि त्याला अपेक्षित फळ मिळते. जाणून घ्या राशीनुसार म्हणतो उपाय करायचे ते.
मेष राशीच्या लोकांनी शैलपुत्री देवीची पूजा करावी. पूजा करतेवेळी या लोकांनी देवीला लाल फुल आणि लाल चंदन अर्पण करावे तसेच ओम दु़ं दुर्गायै नमः या मंत्राचा जप करावा. या उपायामुळे आत्मविश्वास वाढेल, प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल.
वृषभ राशीच्या लोकांनी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी. पूजा करताना देवीला पांढरे फूल आणि दह्याचा नेवैद्य दाखवावा. असे केल्याने वैयक्तिक जीवनात स्थिरता आणि आर्थिक स्थिरता राहील.
मिथुन राशीच्या लोकांनी चंद्रघंटा देवीची पूजा करावी. पूजा करताना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीला घुघरू अर्पण करा. असे केल्याने शत्रूचा नाश होईल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी मन सन्मान मिळेल.
कर्क राशीच्या लोकांनी कृष्मांडा देवीची पूजा करावी. यावेळी देवीला भोपळा किंवा मधाचा नेवेद्य दाखवावा. असे केल्याने आरोग्य चांगले राहील आणि कुटुंबात शांतीचे वातावरण राहील.
सिंह राशीच्या लोकांनी स्कंदमाता देवीची पूजा करावी. या लोकांनी देवीला सोन्याच्या किंवा तांब्याच्या दिव्यामध्ये तूप टाकून दिवा लावावा. हलवा, मालपुआ, बेसनाचे लाडू, केशर खीर किंवा दुधापासून बनवलेल्या मिठाई देखील अर्पण केल्या जातात. यामुळे मुलांना अभ्यासात आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते.
कन्या राशीच्या लोकांनी कात्यायनी देवीची पूजा करावी. या लोकांनी देवीची पूजा झाल्यानंतर कन्या पूजन करावे आणि हिरव्या बांगड्या अर्पण करावे. तसेच देवीला मध किंवा मधाने बनवलेली खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावे. याव्यतिरिक्त, सुपारीची पाने देखील अर्पण करु शकता.
तूळ राशीच्या लोकांनी कालरात्री देवीची पूजा करावी. पूजेदरम्यान गूळ आणि कडुलिंबाची पाने अर्पण करा. तसेच देवीला गुळापासून बनवलेल्या वस्तू, जसे की मालपुआ अर्पण केले जाऊ शकता. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि आर्थिक लाभ होऊ शकतो.
वृश्चिक राशीच्या लोकांनी महागौरी देवीची पूजा करावी. चांदीचे दागिने किंवा पांढरे कपडे दान करावे. पूजा झाल्यानंतर मिठाई, पुरी, चणे आणि हलवा यांसारख्या गोष्टी अर्पण कराव्यात. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद, शांती येते.
धनु राशीच्या लोकांनी सिद्धिदात्री देवीची पूजा करावी. या दिवशी पिवळे कपडे परिधान करा आणि चंपा फुले अर्पण करा. खीर, पुरी आणि शिरा यांसारख्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. शिक्षण, परदेश प्रवास आणि ज्ञान यांच्याशी संबंध असल्याचे म्हटले जाते.
मकर राशीच्या लोकांनी शैलपुत्री देवीची पूजा करावी. यावेळी देवीला लाल फुल आणि लाल चंदन अर्पण केले जाते. काळे तीळ आणि काळे हरभरे याचे दान करावे. हा उपाय केल्यामुळे करिअरमध्ये स्थिरता येईल आणि कर्जापासून सुटका होईल.
कुंभ राशीच्या लोकांनी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी. त्यानंतर देवीला पांढरे फूल आणि दह्याचा नेवैद्य दाखवावा. त्यासोबत भात आणि साखरेचा गोड पदार्थ अर्पण करावे. या उपायामुळे मानसिक शांती आणि अचानक संपत्ती मिळते.
मीन राशीच्या लोकांनी कात्यायनी देवीची पूजा करावी. यावेळी तुम्ही देवीला पिवळी फुले आणि केळी अर्पण करा. हे उपाय केल्याने विवाहाच्या शक्यता बळकट होतील आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)