फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्ती आणि पूजेसाठी पवित्र काळ मानला जातो. भगवान शिवाला हा महिना समर्पित असल्यामुळे भक्ती, तपस्या आणि श्रद्धेचे हे प्रतीक मानले जाते. या महिन्यामध्ये निसर्ग सर्वत्र हिरवळ पसरलेला असतो. या महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करण्याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष परिधान करण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या
श्रावण महिन्याची सुरुवात गुरुवार, 24 जुलैपासून सुरु होत आहे. यावेळी रुद्राक्ष धारण करणे खूप शुभ मानले जाते. दरम्यान भगवान शिवाच्या पूजेसह रुद्राक्ष परिधान करण्याला विशेष महत्त्व आहे. मात्र हे सोमवारी धारण करणे जास्त फायदेशीर ठरते. असे मानले जाते की, सोमवारचा दिवस भगवान शिवाला समर्पित असल्याने या दिवशी रुद्राक्ष धारण केल्याने तुम्हाला शिवाचे आशीर्वाद मिळू शकतात.
ज्योतिषशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, रुद्राक्ष धारण करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळची आहे. यावेळी वातावरण शुद्ध आणि शांत असते, ज्यामुळे रुद्राक्षाची ऊर्जा सहजपणे शोषली जाऊ शकते. मात्र हे शुभ मुहूर्तावर धारण केल्याने अनेक शुभ परिणाम मिळतात, अशी मान्यता आहे. परंतु हे धारण करण्यापूर्वी पवित्र पाण्याने किंवा गंगाजलाने चांगले धुवावे. त्यानंतर, ते भगवान शिवाची पूजा आणि मंत्रांचा जप करून परिधान करावे. धारण करतेवेळी ओम नमः शिवाय किंवा ओम ह्रौण नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे म्हटले जाते.
रुद्राक्ष धारण करताना पांढऱ्या किंवा हलक्या रंगांचे कपडे धारण करावे. पांढरा रंग हा पवित्रता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ध्यान आणि साधना करणे महत्त्वाचे मानले जाते. यामुळे रुद्राक्षाच्या उर्जेचा पूर्ण फायदा होतो आणि मानसिक शांती मिळते. जी व्यक्ती रुद्राक्ष धारण करणार आहे त्यांनी शुद्ध आहार आणि आचरणाचे पालन करावे. तसेच तामासिक तामसिक आहार आणि चुकीची कृत्ये करणे टाळावे. रुद्राक्षाचे विविध प्रकार आहेत ते खूप महत्त्वाचे मानले जाते.
श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करताना धार्मिक विधींचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासोबतच शिवलिंगावर जल अर्पण करणे, बेलाची पाने आणि शिव चालिसा अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला त्याचे आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)