फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत संक्रमण करेल. यावेळी सूर्य भावना, कुटुंब आणि सुरक्षिततेशी संबंधित या राशीमध्ये प्रवेश करेल. या संक्रमणामुळे व्यक्तीची कुटुंब आणि घराशी असलेली ओढ वाढेल, तसेच मातृत्व आणि काळजीची भावना अधिक तीव्र होईल. त्यामुळे नवीन नातेसंबंध मजबूत करणे, जुन्या मतभेदांवर मात करणे अशा अनेक समस्यापासून सुटका होऊ शकते. सूर्याचे संक्रमण संवेदनशीलता असल्याने अहंकार आणि भावनिक चढउतार टाळणे गरजेचे राहील. तसेच या लोकांना आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागेल. कोणत्या राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, जाणून घ्या
सूर्याच्या संक्रमणाचा परिणाम म्हणजे मेष राशीच्या लोकांवरील असलेल्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. घराशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. कुटुंबाच्या पाठिंब्याने परिस्थिती संतुलित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्थिरता मिळेल. मात्र तुम्हाला वैयक्तिक जीवनात संयम बाळगणे गरजेचे आहे.
सूर्याच्या संक्रमणामुळे वृषभ राशीचे लोक या काळात व्यस्त राहतील. सामाजिक संवाद वाढू शकतात. भावंडांमध्ये असलेले मतभेद दूर होतील. मात्र तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाद घालणे टाळावे.
सूर्याचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. या लोकांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या राशीमध्ये सूर्य बाराव्या घरात असल्यामुळे या राशीच्या लोकांना काही प्रवास करावा लागू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमचे बजेट बिघडू शकते.
सूर्याच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीचे लोकांचा कल अध्यात्माकडे वाढलेला दिसेल. या लोकांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. वडिलांशी वैचारिक मतभेद असू शकतात, म्हणून संवादात संयम ठेवणे महत्त्वाचे आहे.
सूर्याच्या संक्रमणामुळे धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मनिरीक्षणाचा राहील.वडिलोपार्जित मालमत्ता किंवा गुंतवणुकीमध्ये तुम्हाला स्पष्टता राखावी लागेल. जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील. तुमच्या मध्ये प्रामाणिकपणा असणे महत्त्वाचे आहे.
सूर्याचे संक्रमण मकर राशीच्या भागीदार घरात असल्यामुळे या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये चढ उतार येण्याची जास्त शक्यता आहे. नात्यांचे गांभीर्य समजून घेण्याची आणि सुधारणा घडवून आणण्याची हीच योग्य वेळ आहे.
सूर्याच्या संक्रमणामुळे कुंभ राशीच्या लोकांना आरोग्याबद्दल काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल. व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)