Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2026: हिरव्या बांगड्यांचा श्रावणाशी काय संबंध? जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिषीय कारण

श्रावण महिना सुरू होताच महिलांच्या साजशृंगारात हिरव्या बांगड्यांना विशेष महत्त्व असते. हिरवा रंग सौभाग्य, समृद्धी आणि निसर्गाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे श्रावणात हिरव्या बांगड्या घालण्यामागे धार्मिक, ज्योतिषीय आणि आयुर्वेदाशी मान्यता जोडलेल्या आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 15, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • श्रावणामध्ये महिला हिरव्या बांगड्या का परिधान करतात
  • श्रावणात हिरव्या बांगड्या परिधान करण्यामागे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारणे काय आहेत
  • श्रावणात हिरव्या बांगड्या परिधान करण्यामागे आयुर्वेदातील फायदे
 

श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात शंकराची उपासना केली जाते. श्रावण महिना निसर्गातील बहरलेली हिरवळ यासाठी विशेष मानला जातो. श्रावण महिन्याची सुरुवात १३ ऑगस्ट रोजी झाली आहे आणि ११ सप्टेंबर रोजी हा महिना संपणार आहे. या महिन्यात अनेक सण व्रत वैकल्ये येत असतात. त्या दिवशी महिला साजशृंगार करतात.

श्रावण महिन्याच्या आगमनासोबतच बाजारपेठा हिरव्या बांगड्या, हिरव्या साड्या आणि मेहंदीने बहरून जातात. या वस्तू मिळणाऱ्या दुकानांवर आणि स्टॉल्सवर विवाहित महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते, तसेच दुकानदारही श्रावणासाठी खास ‘कलेक्शन’ मांडतात. धार्मिक मान्यतेनुसार, हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धी, सौभाग्य आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पाहायला मिळत असल्याने, हा रंग विशेषतः या ऋतूशी जोडला गेला आहे. श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या परिधान करणे शुभ का मानले जाते, हे जाणून घेऊया.

निसर्गाशी आणि निसर्गपूजेशी असलेला संबंध

श्रावणात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. हिरवा रंग हा निसर्गाचे, समृद्धीचे आणि जीवनाचे प्रतीक मानला जातो. श्रावणात निसर्गाची पूजा केली जाते, त्यामुळे या रंगाच्या बांगड्या घालून महिला निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.

Shravan 2026: श्रावणात लावा ‘ही’ रोप, दूर होतील सर्व दोष आणि घरात येईल सुख शांती

हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि संसारामधील सुखासाठी श्रावणात हिरव्या बांगड्या घालणे अत्यंत शुभ मानले जाते. देवी पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती, तेव्हा तिने निसर्गाशी एकरूप होणारा हिरवा रंग धारण केला होता, अशी मान्यता आहे.

मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते

रंगशास्त्रानुसार हिरवा रंग डोळ्यांना आणि मनाला शांतता देणारा असतो. श्रावणात वातावरणातील आद्रतेमुळे मन आणि शरीरावर होणारा ताण कमी करण्यासाठी हिरवा रंग उपयुक्त ठरतो. बांगड्यांच्या काचांचा नाद (आवाज) घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

Astrology 2026: स्वातंत्र्यदिनी घडणार एक मोठा योगायोग, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

हिरव्या बांगड्या परिधान करण्याचे आयुर्वेदातील फायदे

मनगटावर बांगड्यांचा सतत होणारा घर्षण-दाब शरीरातील रक्तभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत करतो. तसेच, काचेच्या बांगड्यांमुळे शरीरातील अतिरिक्त ऊर्जा नियंत्रणात राहते, असाही एक समज आहे.

श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालणे हे केवळ सौंदर्य किंवा परंपरेचा भाग नसून, त्यामागे आरोग्य, मनाची शांतता आणि निसर्गाचा आदर या तिन्हींचा सुंदर संगम मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्रावण महिन्यात महिला हिरव्या बांगड्या का घालतात?

    Ans: श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी आणि निसर्गाच्या हिरवाईसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे हिरवा रंग समृद्धी, सौभाग्य आणि निसर्गाचे प्रतीक मानून महिला हिरव्या बांगड्या घालतात.

  • Que: हिरव्या बांगड्यांचा धार्मिक अर्थ काय आहे?

    Ans: हिरवा रंग शुभत्व, समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे श्रावणात हिरव्या बांगड्यांना विशेष महत्त्व दिले जाते.

  • Que: हिरव्या बांगड्यांचा निसर्गाशी काय संबंध आहे?

    Ans: श्रावणात पावसामुळे झाडे, पाने आणि परिसर हिरवागार होतो. त्यामुळे हिरवा रंग या ऋतूतील निसर्गाचे प्रतीक मानला जातो.

Web Title: Shravan 2026 what is the connection between green bangles and the month of shravan religious reasons and ayurvedic benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.